Ganesh Visarjan 2024 saam tv
धार्मिक

Ganesh Visarjan 2024: गणपती विसर्जनावेळी बाप्पाची मूर्ती घराबाहेर आणताना 'ही' मोठी चूक करू नका, पाहा कोणत्या गोष्टींची घ्याल काळजी?

Ganesh Visarjan 2024: दहा दिवसांच्या पाहुणचारांनंतर आज बाप्पा परतणार आहेत. गणपती बाप्पांना निरोप देताना म्हणजेच विसर्जनाच्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, हे पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

तब्बल १० दिवस पाहुणचार स्विकारल्यानंतर आज गणपत्ती बाप्पा परत जाणार आहे. आज अनंत चतुर्दशी असून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज १७ सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशी असून आज सर्व गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे.

गणपती विसर्जन हे कोणी नदी, तलाव, सुमद्र किंवा कृत्रिम तलावात केलं जातं. सार्वजनिक गणपतीचं विसर्जन हे प्रामुख्याने मोठ्या तलावात किंवा समुद्रामध्ये करण्यात येतं. गणेश चतुर्थीच्या दिवशी जशी बाप्पाच्या मूर्तीची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाते तसंच अनंत चतुर्दशीला पूर्ण विधिपूर्वक आणि योग्य पद्धतीने त्याचं विसर्जन करणं महत्त्वाचं आहे. अशातच गणपती विसर्जनादरम्यान कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, हे पाहूयात.

गणपती विसर्जन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?

  • गणपती विसर्जन करण्यासाठी पहिल्यांदा गणपतीची आरती करा. यावेळी त्यांना नवैद्य दाखवा. या काळात तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबाबत माफी मागा

  • गणेश विसर्जनासाठी जाताना लक्षात ठेवा की बाप्पााच्या मूर्तीचं तोंड घराकडे असावं आणि त्याची पाठ घराबाहेर असावी. श्रीगणेशाच्या पाठीमागे गरिबी वास करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

  • अनंत चतुदर्शीचा शुभ मुहूर्त काय आहे हे पाहून घ्या. भद्रा काळ असताना गणपतीचं विसर्जन करू नये.

  • गणेश विसर्जनस्थळी पोहोचल्यानंतर गणपती बाप्पाला आसनावर आदरपूर्वक बसवावं. त्यावर अक्षता, हळद आणि कुंकू लावून तिलक लावावा. यावेळी दिवा लावा, अन्नदान करा, आरती करावी.

  • यावेळी बाप्पाला दाखवण्यात आलेला प्रसाद सर्वांना वाटावा. त्यानंतर गणपती विसर्जन करावं.

  • गणपती विसर्जन करताना बाप्पााच्या नावाचा जयजयकार करावा. त्यानंतर हळू हळू पाण्यामध्ये मूर्तीचं विसर्जन करावं.

  • विसर्जन करताना पाणी स्वच्छ आहे की नाही याची खात्री करून घ्या.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT