अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण: १० वर्षानंतरही न्याय नाही, कुटुंबांनी केली इच्छामरणाची मागणी

Police officer Ashwini Bidre Murder Case News : पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात शिक्षा सुनावूनही प्रशासनाकडून मृत्यू दाखला व सेवासंबंधित लाभ न मिळाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली आहे.
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण: १० वर्षानंतरही न्याय नाही, कुटुंबांनी केली इच्छामरणाची मागणी
Police officer Ashwini Bidre Murder Case NewsSaam Tv
Published On
Summary
  • अश्विनी बिद्रे हत्याकांडाला १० वर्षांनंतरही न्याय न मिळाल्याचा आरोप

  • कुटुंबीयांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी

  • आरोपीला शिक्षा होऊनही मृत्यू दाखला प्रलंबित असल्याचा दावा

  • सेवासंबंधित लाभ न मिळाल्याने कुटुंबीय अडचणीत

रणजित माजगावकर, कोल्हापूर

Police officer Ashwini Bidre Murder Case Family Demand Euthanasia महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाला तब्बल दहा वर्षे उलटूनही न्याय न मिळाल्याचा आरोप करत बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. कुटुंबीयांनी देशाच्या द्रौपदी मुर्मू आणि देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. न्यायालयात खून सिद्ध झाल्यानंतरही प्रशासन मृत्यूचा अधिकृत दाखला देत नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच सेवेत असताना असलेल्या लाभांपासूनही कुटुंबाला वंचित ठेवल्याचे सांगितले जात आहे.

राज्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणात प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, शिक्षा होऊनही बिद्रे गोरे कुटुंबीयांना अद्याप प्रशासकीय पातळीवर न्याय मिळालेला नाही, असा दावा करण्यात येत आहे. बिद्रे यांचा मृत्यू होऊन 10वर्षे उलटले, न्यायालयाने खून झाल्याचे स्पष्ट केले, तरीही मृत्यू प्रमाणपत्र देण्यात प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांचे पती राजू गोऱ्हे यांनी केला आहे.

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण: १० वर्षानंतरही न्याय नाही, कुटुंबांनी केली इच्छामरणाची मागणी
Sunday Megablock : रविवारी मध्य अन् हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक

यामुळे सेवा वेतन, विमा आणि इतर सेवेचे लाभ कुटुंबाला मिळू शकलेले नाहीत. याचबरोबर प्रमुख आरोपीला तुरुंगात पोलीसांकडून मदत केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना न्यायासाठी इच्छामरणाची मागणी करावी लागणे, ही राज्यातील यंत्रणेसाठी गंभीर बाब मानली जात आहे. या प्रकरणाकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण: १० वर्षानंतरही न्याय नाही, कुटुंबांनी केली इच्छामरणाची मागणी
Kalyan News : खळबळजनक! कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आढळला महिलेचा मृतदेह, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण काय आहे?

अश्विनी बिद्रे ह्या पोलीस अधिकारी होत्या. त्यांचं लग्न २००५ साली राजू गोरे यांच्याशी झाला होत. लग्नानंतर एकाच वर्षात त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती मिळवली. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक पुणे येथे, तर त्यानंतर सांगली येथे झाली. याच काळात सांगलीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. हळूहळू त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. अश्विनी यांना प्रमोशन मिळाल्यामुळे त्यांची बदली रत्नागिरी येथे झाली. मात्र, कुरुंदकर तिथेही त्यांना भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकार अश्विनी यांचे पती आणि वडिलांच्या लक्षात आले. या नंतर अश्विनी आणि कुरुंदकर यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. अश्विनी यांची बदली २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. मात्र, त्या ठिकाणी त्या हजरच झाल्या नाहीत. याबाबत पोलिस खात्याकडून त्यांच्या गैरहजेरीवर प्रश्न उपस्थित करणारे पत्र पाठवण्यात आले.

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण: १० वर्षानंतरही न्याय नाही, कुटुंबांनी केली इच्छामरणाची मागणी
Sambhajinagar News : ७ वर्षांच्या मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार, सख्ख्या आईनेच केली मदत; संभाजीनगरमध्ये खळबळ

त्यानंतर अश्विनी यांचे कुटुंबीय सतर्क झाले आणि त्यांना त्या बेपत्ता असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. १५ एप्रिल २०१६ रोजी अचानक बेपत्ता झालेल्या पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली. अश्विनी यांच्या हत्येमागे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. यानंतर तपासात अश्विनी यांची क्रूर पद्धतीने हत्या करून मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला एप्रिल २०२५ साली जन्मठेप आणि २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com