Dhanteras 2022 : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीमध्ये सर्वत्र रोषणाई असते. या काळात सगळीकडे बाजार भरलेला आपल्याला पाहायला मिळतो. दिवाळीत धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यंदा धनत्रयोदशी २२ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.
धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते आणि जर कोणी सोने खरेदी करू शकत नसेल तर चांदी, पितळ किंवा स्टील देखील खरेदी करू शकतो. परंतु या चार धातूंपैकी कोणताही एक धातू विकत घेण्याची परंपरा आहे. पण सोने खरेदी करणे सर्वात शुभ का मानले जाते?
खरे तर सोने अत्यंत शुद्ध मानले जाते आणि असे मानले जाते की, सोन्यात धनाची देवी लक्ष्मीचा वास असतो. तर मग फक्त धनत्रयोदशीलाच सोने का खरेदी केले जाते ? त्यामागील कथा काय आहे आणि धनत्रयोदशीला दीपदान आणि पूजेचे महत्त्व का आहे, जाणून घेऊया. धनत्रयोदशी पहिल्यांदा कधी साजरी (Celebrate) झाली हे देखील जाणून घ्या.
केवळ धनत्रयोदशीवरच नाही तर दसरा, अक्षय्य तृतीया, मकर संक्रांती, नवरात्री या तिथीला दिवाळीपर्यंत सोने खरेदी करण्याची परंपरा आहे, मात्र धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे सर्वात शुभ मानले जाते. मात्र, या दिवशी लोक घर (Home), गाडी आणि गुंतवणूकही करतात.
धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यामागील पौराणिक कारण
एका पौराणिक कथेनुसार, हिमा नावाच्या राजाच्या 16 वर्षांच्या मुलाचे एका मुलीशी लग्न झाले होते, परंतु ज्योतिषींनी भाकीत केले की, राजकुमाराचे लग्न झाल्यानंतर चौथ्या दिवशी सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू होईल. हे कळताच राजा आणि राजपुत्राची पत्नी अतिशय दु:खी झाली.
पण पत्नीने आपल्या पतीचे प्राण वाचवायचे ठरवले आणि लग्नाच्या चौथ्या दिवशी वाड्यातील सर्व दागिने आणि सोने गोळा करून मुख्य गेटसमोर एका ढिगाऱ्यात ठेवले. त्याचवेळी तिने राजकुमारला जागं ठेवण्यासाठी एकामागून एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. कारण ज्योतिषांनी सांगितले की, राजकुमार झोपला की रात्री त्याला साप चावेल, म्हणून तिने त्याला जागे ठेवण्यासाठी असे प्रयत्न केले.
यमाच्या रुपात आलेला साप राजपुत्राला दंश करण्यासाठी येत असताना त्याला राजवाड्याच्या मुख्य दरवाजावर असलेल्या दागिन्यांच्या झगमगाटामुळे काहीच दिसेनासे झाले. त्याच दरम्यान, मुलीने गायलेल्या मधुर गाण्याने यम मंत्रमुग्ध झाला आणि तिथेच थांबला व त्याच वेळी सूर्यौदय होऊन राजकुमाराच्या मृत्यूची ग्रहांनी ठरवलेली वेळ चुकली व त्यानंतर यम राजकुमाराचा जीव न घेता परतला. त्यासाठी आपल्या पतीलाही दीर्घायुष लाभावे यासाठी या दिवशी धन खरेदी केले जाते
अशा प्रकारे धनत्रयोदशीची परंपरा सुरू झाली
सोन्याच्या दागिन्यांमुळे आंधळा होण्यापासून राजपुत्राचा मृत्यू वाचला आणि त्यामुळेच या दिवसापासून धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याची परंपरा सुरू झाली. आणि यमाच्या नावाचा दिवा लावला जाऊ लागला. धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजासमोर भगवान यम आणि देवी लक्ष्मीचा दिवा लावावा.
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीमध्ये सर्वत्र रोषणाई असते. या काळात सगळीकडे बाजार भरलेला आपल्याला पाहायला मिळतो. दिवाळीत धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यंदा धनत्रयोदशी २३ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.