Diwali 2022
Diwali 2022Saam Tv

Diwali 2022 : भारतातील 'या' ठिकाणी दिवाळी साजरी केली जात नाही; जाणून घ्या, कारण

भारतात हा विशेष आणि मोठा सण असूनही, देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे दिवाळी साजरी होत नाही.
Published on

Diwali 2022 : हिंदू धर्मात दिवाळीला अधिक महत्त्व आहे. भारतात सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात खास आहे. दिवाळीला असा विशेष सण म्हटले जात नाही, लोक वर्षभर या सणाची वाट पाहत असतात.

दिव्यांची आरास, रांगोळीचा रंग, उटण्याचा गंध, फराळ व मिठाईची चव चाखण्यासाठी दिवाळीची वाट पाहतात. दिवाळीची (Diwali) सुरुवात घराच्या स्वच्छतेने होते, लोक घरे सजवतात, दिवे लावतात, रोषणाई करतात. (Latest Marathi News)

भारतात (India) हा विशेष आणि मोठा सण असूनही, देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे दिवाळी साजरी होत नाही. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी आणि इथे दिवाळी साजरी न करण्याचे कारण सांगत आहोत.

Diwali 2022
Diwali 2022 : धनतेरसपासून ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी आहे खास, 'या' ५ दिवासांचे महत्त्व व पूजा विधी जाणून घ्या

1. केरळ -

दिवाळीच्या दिवशी, देशभरातील लोक त्यांच्या घरात देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा करतात, परंतु भारताच्या दक्षिणेकडील केरळ राज्यात दिवाळीचा सण साजरा केला जात नाही. केरळमध्ये दिवाळी साजरी न करण्यामागे अनेक कारणे आहेत. यापैकी एक म्हणजे येथे महाबली या राक्षसाची पूजा केली जाते आणि रावणावर विजय मिळविल्यानंतर प्रभू श्री राम परत आल्याचा आनंद साजरा करण्यासाठी दिवाळीचा सण साजरा केला जातो.

याच कारणामुळे येथील लोक राक्षसाच्या पराभवावर पूजा करत नाहीत. केरळमध्ये दिवाळी साजरी न करण्यामागे आणखी एक कारण आहे. केरळमध्ये हिंदूंची संख्या कमी आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी येथे फार कमी हालचाल पाहायला मिळतात. दिवाळीच्या वेळी केरळमध्ये पावसाळा असतो आणि या ऋतूत लोक फटाके आणि दिवेही पेटवू शकत नाहीत.

Diwali 2022
Diwali Recipe 2022 : तोंडात विरघळेल अशी खुसखुशीत शंकरपाळी, झटपट बनेल !

2. तमिळनाडू -

केरळबरोबरच तामिळनाडूतही दिवाळी साजरी केली जात नाही. दिवाळीच्या एक दिवस आधी येणारा नरक चतुर्दशी हा सण तामिळनाडूमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. नरक चतुर्दशी ही उत्तर भारतात छोटी दिवाळी म्हणून साजरी केली जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com