बातमी मागची बातमी

बापरे ! जीवघेणा कोरोना महाराष्ट्रात, पुण्यात दोघांना कोरोनाची लागण

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन संशयित रुग्ण‍ आढळून आले आहेत. दोन्ही रुग्णांना नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देशात 45वर पोहोचली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णामध्ये  कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहे. तर दुस-या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आली नाहीत. सदर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. तथापि, नागरिकांनी घाबरुन जाण्याची काहीही कारण नाही. होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गांवोगांव भरणा-या यात्रा व ऊरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. होळी सण आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

केरळमध्ये दोघांना अटक


कोरोना व्हायरस संदर्भात अफवा पसरवणाऱ्या दोघांना केरळमध्ये अटक करण्यात आली आहे. केरळमधील कुन्नमकुलम पोलिसांनी दोघांना अटक केली. परवेश लाल आणि अनास या दोघांना अटक करण्यात आलीय. त्रिशूर जिल्ह्यातील कुन्नमकुलम तालुका रुग्णालयात कोरोनाचा व्हायरसची लागण झालेले रुग्ण दाखल करण्यात आल्याची खोटी माहिती दोघेजण फसरवत होते. त्यामुळं दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 
 

भारतातील शहरनिहाय कोरोनो बाधित रुग्णांची संख्या 

दिल्ली - 4 
हरियाणा - 14 (विदेशी नागरिक)
केरळ - 9 
राजस्थान - 2 (विदेशी नागरिक)
तेलंगण - 1
उत्तर प्रदेश - 9 
लडाख (केंद्र शासित प्रदेश) - 2 
तमीळनाडू - 1 
जम्मू-काश्मीर - 1 
पंजाब - 2
कर्नाटक - 1 


Web Title: two person returned from dubai suspected coronavirus hospitalized india updates

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs MI, IPL 2024: रोहित वाढदिवशी मुंबईला गिफ्ट देणार? लखनऊविरुद्ध टेन्शन वाढवणारा राहिलाय रेकॉर्ड

Sonalee Kulkarni : ही तर गुलाबी साडीमधली सोनपरी

Nashik Lok Sabha: नाशिक लोकसभेच्या रिंगणात महंतांची मांदियाळी; शांतीगिरी महाराजांनंतर आणखी एका महंताने भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Sangli Loksabha: सांगलीत विशाल पाटलांची ताकद वाढली; वंचित आघाडीकडून पाठिंबा जाहीर

Narendra Modi : नकली शिवसेना-राष्ट्रवादीने राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचे निमंत्रण धुडकावलं; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT