Narendra Modi : नकली शिवसेना-राष्ट्रवादीने राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचे निमंत्रण धुडकावलं; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Narendra Modi speech in dharashiv : धाराशीवमधील महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ सभेतून मोदींनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.
Narendra Modi
Narendra Modi Saam tv

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सभांचा धडाका लावला. आज मंगळवारी मोदींची दिवसभरातील दुसरी सभा सुरु आहे. धाराशीवमधील महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ सभेतून मोदींनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. 'नकली शिवसेना-राष्ट्रवादीने राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचे निमंत्रण धुडकावलं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे

आपण माझ्या दहा वर्षापूर्वींचा काळ बघितला. आता भारताला जग चंद्रयानाला मुळे ओळखू लागले आहे. जिथे कोणी पोहोचले नाही, तिथे आपण पोहोचलो.

भारताने कोटी लोकांचे जीव वाचवले. भारत गोळीबारातून आपल्या नागरिकांना बाहेर काढतो. आधी अतेरिकी हल्ला करायचे, त्यानंतर पळून जायचे. काँग्रेस सरकार रडायचे. जे सरकार स्वतः कमजोर असेल, ते देशाला मजबूत करू शकतं का?

काँग्रेस सरकार भारताला वेगळ्या उंचीवर नेऊ शकतं का? काँग्रेसची एक ओळख विश्वासघात अशी आहे. काँग्रेस साठ वर्षे सत्तेत होती, पण मराठवाड्याला पाणी दिलं नाही.

मराठवाडा वॉटरग्रिडला कोणी अडवलं, जलयुक्त शिवार कोणी रोखलं. तुमचं पाणी त्यांनी अडवलं. पाणी समस्या टाळत नाही, मोदी हे समस्याला तोंड देतात. प्रत्येक घरात पाणी पोहोचवणे, शेतात पाणी पोहोचवणे मोदींचे मिशन आहे.

आता तर दहा वर्षे झाली, दहा वर्षात जे पाण्यावर काम मोदींनी केलं, ते साठ वर्षात काँग्रेस करू शकली नाही. ७५ लाख लोकांना पाच वर्ष पाणी दिले. काँग्रेसने ज्या सिंचन योजनेत अडवलं, त्याला मोदी पूर्ण करत आहे. मोदी नवीन सिंचन योजना सुरू करत आहे.

Narendra Modi
Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या नेतृत्वात सरकारचं काम सुरु आहे. आधी पॅकेजचे पैसे लोकांपर्यंत जात नव्हते. हे पैसे काँग्रेसचा पंजा पळवून नेत होता. आमच्या सरकारने ८०० कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिले.

आम्ही दहा वर्षांत शेतकऱ्यांना युरियाची कमी भासू दिली नाही. अडीच लाख कोटींची सबसिडी दिली.

३००० रुपयांचा युरिया ३०० रुपयांत दिला. एक पोते युरियची ताकद, एका बॉटलमध्ये आणली.

दुष्काळ असो अतिवृष्टी असो, शेतकऱ्यांना अशा अनेक अडचणी येतात, अशा शेतकऱ्यांना मोठी मदत मिळाली. काँग्रेसचे लोक शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या गोष्टी बोलतात.

हा फत्त ट्रेलर आहे. आता मोदींचे मिशन देशाला आत्मनिर्भर बनवायचं आहे.

मोदींनी ठरवलं, आता पैसा बाहेर जाणार नाही, शेतकऱ्यांच्या खिशात जाणार. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी वाईट हाऊसला बोलावलं.

राष्ट्रपतींनी रात्री जेवायला अन्न दिलं, अभिमान वाटला.

ते माझ्यावर खोटे आरोप करतात, शिव्या देतात. ते म्हणतात, मोदी आला तर लोकशाही संपेल, संविधान बदलेल,

असे खोटे बोलायची गरज काय? तुम्हाला खरं बोलायला काही नाही का? सगळ्यात जास्त आमदार, विधानपरिषद सदस्य, खासदार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे आहे.

काँग्रेसची नजर तुमच्या मेहनतीच्या कमाईवर आहे. प्रत्येक आई-बाप बचत करण्याचा प्रयत्न करतात.

त्यांचे मत असते, मुलांना मिळाले पाहिजे. काँग्रेस ने असा विचार केलाय की, वारसा कर लावायचा. तेव्हा मंगळसूत्र देखील मुलांना मिळणार नाही. काँग्रेस महिलांचे दागिने, मंगळसूत्र हाडपायला निघाली आहे.

भव्य राम मंदिर तयार झाले आहे. आज पूर्ण जगातील रामभक्त अयोध्या चालले आहे. काँग्रेस, नकली राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आमंत्रण धुडकावले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com