Nashik Lok Sabha: नाशिक लोकसभेच्या रिंगणात महंतांची मांदियाळी; शांतीगिरी महाराजांनंतर आणखी एका महंताने भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

Maharashtra Lok Sabha Election 2024: नाशिक लोकसभेच्या रिंगणात महंतांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. शांतीगिरी महाराजांनंतर आणखी एका महंतांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
महंतांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला
Nashik Lok SabhaYandex
Published On

अभिजित सोनवणे साम टिव्ही, नाशिक

नाशिक लोकसभेच्या (Nashik Lok Sabha) रिंगणात महंतांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. शांतीगिरी महाराजांनंतर आणखी एका महंतांनी अपक्ष उमेदवारी (Independent Candidature) अर्ज भरला आहे. आता नाशिक लोकसभेच्या रिंगणात आध्यात्मिक गुरूंची मांदियाळी दिसत आहे. शांतीगिरी महाराजांनंतर आणखी एक आध्यात्मिक गुरू नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले (Nashik News) आहेत.

नाशिक लोकसभेसाठी सिद्धेश्वरानंद स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती (Siddheshwaranand Swami Someshwarananda Saraswati) यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. आता सिद्धेश्वरानंद स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती अपक्ष उमेदवार (Independent Candidature) म्हणून नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

तर महंत अनिकेत शास्त्री देखील १ ते २ दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक लोकसभेच्या रिंगणात (Nashik News) आध्यात्मिक गुरूंची मांदियाळी उतल्याचं दिसत आहे. नाशिक लोकसभेतील निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अगोदरच महाविकास आघाडीचा जागांचा तिढा सुटत नव्हता, तेच आता या रिंगणात महंतांनी देखील हजेरी लावली (Nashik Election) आहे.

नाशिकच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न आता निर्माण होताना दिसत आहे. गिरीश महाजनांची शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळासोबत आज अचानक भेट घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन हे आज अचानक नाशिक दौऱ्यावर आहेत.

महंतांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला
Nashik Lok Sabha 2024: नाशिक लोकसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांचं दबावतंत्र? ओबीसींची ताकद दाखवण्यासाठी मोठी खेळी

नाशिक लोकसभेच्या रिंगणात (Nashik Constituency) मोठा एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. शांतिगिरी महाराजांनी काल नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरलाय. मात्र शांतीगिरी महाराजांना पक्षाकडून अद्याप AB फॉर्म मिळाला नाही. तीन मेपर्यंत AB फॉर्म जमा करण्याचे आदेश त्यांना नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले (Nashik Politics) आहेत. नाशिक लोकसभेच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरुच आहे. अशातच महंतांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे मोठा धक्का बसत आहे. नाशिकच्या देवभूमीत साधू महंत यांना खासदारकी मिळावी, अशी भूमिका शांतीगिरी महाराजांनी घेतल्याचं दिसत आहे.

महंतांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला
Nashik Lok Sabha: नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी; हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com