Sangli Loksabha: सांगलीत विशाल पाटलांची ताकद वाढली; वंचित आघाडीकडून पाठिंबा जाहीर

Sangli Loksabha Constituency: वंचितची ताकदही विशाल पाटील यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभेत विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
Sangli Loksabha:
Sangli Loksabha: Saamtv

आवेश तांदळे, सांगली|ता. ३० एप्रिल २०२४

सांगली लोकसभेसाठी अपक्ष शड्डू ठोकल्यानंतर काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी सभा, बैठकांचा धडाका लावला आहे. एकीकडे विशाल पाटील यांनी मतदारसंघातील जुन्या नेत्यांच्या गाठीभेठी सुरू केल्या असतानाच आता वंचितची ताकदही विशाल पाटील यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभेत विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल पाटील यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील तर महायुतीकडून संजय पाटील यांचे आव्हान असेल. एकीकडे विशाल पाटील यांनी प्रचारसभांचा धडाका लावला असतानाच वंचित बहुजन आघाडीनेही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता वंचितने विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी सांगली लोकसभेत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला होता. आता तो निर्णय बदलत विशाल पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे.

Sangli Loksabha:
Nashik Accident: दैव बलवत्तर म्हणून वाचला! ट्रकच्या धडकेत विजेचा खांब कोसळला; पुढे जे घडलं ते.. काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

दरम्यान, सांगली लोकसभेत विशाल पाटील यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर काँग्रेस पक्षामध्येच मोठी नाराजी पसरली होती. आमदार विश्वजित कदम यांनी या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्ठींसमोरच मनातील खंत बोलून दाखवली होती. त्यानंतर विश्वजित कदम चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभागी होणार का? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र विश्वजित कदम यांनी आघाडीधर्म पाळत चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे.

Sangli Loksabha:
Wardha Firing : आतेभावाची प्रगती बघवली नाही, तरूणानं थेट गोळीबार केला; वर्ध्याच्या घटनेनं खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com