बातमी मागची बातमी

कोरोनाग्रस्त महिलेच्या मृत्यनंतरही मटनाच्या पंगती, महाड पंचायत समितीतील धक्कादायक प्रकार

सकाळ न्यूज नेटवर्क

कोरोनाग्रस्त महिलेच्या मृत्यनंतरही मटनाच्या पंगती उठवल्याचा प्रकार रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये घडलाय. विशेष म्हणजे हा प्रकार कुणी नागरिकांना नाही, तर चक्क अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी केलाय. इथल्या पंचायत समितीत आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर सगळ्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं...मात्र, असं असतानाही इथल्या पंचायत समितीत मटनाची पार्टी करण्यात आली..या सगळ्या प्रकारनंतर आता नागरिकांमधून रोष व्यक्त होतोय.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांचा वाढदिवस आणि पंचायत समितीची मासिक सभा असा योग जुळून आल्याने हा बेत आखण्यात आलेला होता. लॉकडाऊनमध्ये ग्रामसभा, मासिक सभा घेण्याबाबत निर्बंध आहेत. तरीही महाड पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात जुजबी पार पडली. 

याच दिवशी आज गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांचा वाढदिवस असल्याने भात, मटण, रस्सा जेवणही ठेवलेले होते. सभापतींच्या दालनामध्ये मेजवानीच्या पंगती झोडल्या गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर महसूल, पोलिस, आरोग्य यंत्रणा चोवीस तास कोरोनाशी सक्रियपणे लढा देत आहे. 

गरिबांना अन्नाशिवाय दिवस काढावे लागत आहेत, तर दुसरीकडे पंचायत समितीच्या सभापती, तसेच अन्य पदाधिकारी आणि अधिकारी यांनी मात्र अशा प्रकारे मटणाच्या जेवणाला हजेरी लावल्याने या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्‍यातील बीरवाडी येथे कोरोनामुळे महिलेच्या मृत्यू झाला, 

तर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेचे उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे; परंतु पंचायत समितीत हे सर्व नियम आणि आदेश बासनात गुंडाळून कार्यालयातच भरदिवसा जेवणाचा आस्वाद घेतला गेला. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे दोन्ही फोन नंबर बंद होते; परंतु शहरात मात्र या जेवणाची जोरदार चर्चा रंगलेली होती.

Web Title - Mutton party even after the death of a corona Affected woman
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

SCROLL FOR NEXT