AAdhaar UIDAI Recruitment  Saam Tv
naukri-job-news

UIDAI Recruitment: UIDAI मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १,५१,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

UIDAI Section Officer Recruitment 2026: यूआयडीएआयमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेक्शन ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. यूआयडीएआय म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. यूआयडीएआय ही कंपनी आधार कार्ड बनवते. या कंपनीत सेक्शन ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. तुम्ही सेक्शन ऑफिसर पदासाठी अर्ज करु शकतात.

UIDAI मध्ये नोकरीची संधी

यूआयडीएआयमधील (UIDAI) ही भरती बंगळुरुस्थित टेक्नोलॉजी सेंटरसाठी काढण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी येत्या काही दिवसातच अर्ज करायचे आहेत.

यूआयडीएआयमध्ये एकूण २ पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला यूआयडीएआय टेक्नोलॉजी सेंटर, बंगळुरु येथे नोकरीसाठी जायचे आहे. या नोकरीसाठी तुम्ही uidai.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

पगार

यूआयडीएआयमधील सेक्शन ऑफिसर पदासाठी निवड झाल्यावर तुम्हाला पे लेव्हल ८ नुसार 47,600-1,51,100 रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

शैक्षणिक पात्रता

यूआयडीएआयमध्ये सेक्शन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सरकारी सेवेत काम केलेले असावे. त्यांनी लेव्हल ७ पोस्टवर ३ वर्षांसाठी काम केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असावे.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला वेबसाइटवर Annex I मध्ये फॉर्मचा फॉर्मॅट दिला आहे. त्यानुसार तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता याबाबत माहिती भरायची आहे. यानंतर हे कागदपत्र एचआर, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, आधार कॉम्प्लेक्स, एनटीआय ले आउट, टाटा नगर, बंगळुरु ५६००९२ या ठिकाणी पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे पदाधिकारी हत्याप्रकरणातील तीन आरोपींना 4 दिवसांची तर एका आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी

Rahu Gochar 2026: मायावी राहूच्या गोचरमुळे 'या' राशींना मिळेल प्रेम अन् पैशांचं घबाड

महायुतीचे ६५ उमेदवार बिनविरोध, राज ठाकरेंकडे पुरावे, मनसे कोर्टात जाणार

महापालिकेचा महारणसंग्राम! मित्रपक्ष आमने-सामने; भाजप–अजित पवार गटात तुंबळ हाणामारी

Dark Circles: डोळ्यांखाली डार्क सर्कल झालेत? मग या सोप्या घरगुती उपायाने डार्क सर्कल होतील कायमचे दूर

SCROLL FOR NEXT