गुगलवर नाव शोध, मी मोठा ऑफिसर; मटन घ्यायला रांगेत उभं केल्याने ग्राहक भडकला, दुकानदारासोबत केलं हादरवणारं कृत्य

Baramati Crime news : बारामतीत मटन घ्यायला रांगेत उभं केल्याने ग्राहक भडकला. या ग्राहकाने दुकानदारासोबत हादरवणारं कृत्य केलं.
Baramati Crime news
Baramati Crime Saam tv
Published On
Summary

मटन रांगेत घ्यायला उभं केल्याने ग्राहक भडकला

आरोपीने मटन दुकानदाराचं अपहरण केलं

या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक

Baramati Crime News : 'मला रांगेत थांबायला वेळ नाही, मी मोठा आहे' अशी मग्रुरी दाखवणाऱ्या ग्राहकाने सहकाऱ्यांच्या मदतीने थेट मटन दुकानदाराचे अपहरण केलं. त्यानंतर दुकानदाराला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बारामतीत तालुक्यात घडली. ग्राहकाने दुकानदाराला थेट कोयता, बेल्ट आणि हातांनी बेदम मारहाण केली.

ज्ञानेश्वर भारत आटोळे हे 'जय भवानी मटन शॉप' चालवतात. या दुकानाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सुर्यनगरी येथील दुकानावर मटन खरेदीदरम्यान एका व्यक्तीने रांगेत उभे राहण्यास नकार देत 'गुगलवर माझं नाव शोध, मी मोठा ऑफिसर आहे' अशी दमदाटी केली. यावरून दोघांमध्ये वाद-विवाद झालाय. वजनाचा काटा उचलून मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर तो व्यक्ती मटन घेऊन निघून गेला. ऑनलाईन पेमेंटवरून त्याचे नाव 'स्वागत हनुमंत सोरटे' असे असल्याचे समोर आले.

Baramati Crime news
भारतातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी? कारण काय? VIDEO

ज्ञानेश्वर आटोळे हे दुकानातील कामगारासह बाहेर असताना ऋषी गावडे याच्यासोबत नियोजन करून दोन गाड्यांमधून आलेल्या ५ इसमांनी त्यांना जबरदस्तीने एका कारमध्ये बसवलं. जळोची गावाच्या दिशेने नेताना व्हिडीओ कॉलद्वारे पूर्वी दुकानावर वाद घातलेला ग्राहकच संपर्कात होता. ' त्यानेच मारहाणीचे आदेश दिल्याचा दुकानदाराचा आरोप आहे. मी सांगितले तसेच करा, मला बघू द्या यात किती दम आहे, असं म्हणत त्याने आदेश दिल्याचा दुकानदाराचा आरोप आहे.

Baramati Crime news
पुण्यातील उच्चशिक्षित जोडपं लव्ह मॅरेजनंतर २४ तासांच्या आत झालं वेगळं; कारण फक्त एवढंच

कन्हेरी रोड आणि जळोची ब्रिज परिसरात नेऊन मारहाण केली. 'तुला जिवंत सोडणार नाही' अशी धमकी देखील त्यांनी दिली. या दरम्यान पोलीस, पीडित व्यक्तीचा भाऊ आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी अपहरण करून मारहाण करणे असा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Baramati Crime news
सामना सुरू होण्याआधीच क्रिकेट कोचचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; क्रीडाविश्वावर शोककळा

आरोपी ऋषी गावडे यास पोलिसांनी अटक केली. त्याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात संकेत मुसळे, शितल बेंगारे राहणार पारवडी हे सुद्धा गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com