UCO Bank Job Saam Tv
naukri-job-news

UCO Bank Recruitment: फ्रेशर्स आहात? युको बँकेत नोकरीची संधी; ५०० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

UCO Bank Apprentice Recruitment: युको बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. युको बँकेत ५०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युको बँकेत सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. फ्रेशर्ससाठी ही उत्तम संधी आहे. युको बँकेत सध्या अप्रेंटिसशिप पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. देशभरात ही भरती केली जाणार आहे.

युको बँकेने देशभरातली ब्रँचसाठी ही भरती जाहीर केली आहे. एकूण ५०० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना बँकेत काम करायचे आहे. त्यांच्यासाठी करिअरची सुरुवात म्हणून ही उत्तम संधी आहे.

युको बँकेतील ही भरती सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. www.uco.bank.in या वेबसाइटवर जाऊन इच्छुकांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२५ आहे.

युको बँकेतील या भरतीमध्ये ५३२ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जपप्रक्रिया २१ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

युको बँकेतील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. त्यांच्याकडे मार्कशीट असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि लोकल लँग्वेज टेस्टद्वारे होणार आहे.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला NATS पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल.

यानंतर रजिस्ट्रेशन आणि लॉग इन करावे लागेल.

यानंतर तुमची सर्व माहिती भरा. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीबाबत माहिती द्या.

यानंतर फोटो आणि सही अपलोड करा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी प्रिंट आउट काढून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divorce Case : पतीला जाडा किंवा काळा बोलणं घटस्फोटाचं कारण मानलं जाऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Maharashtra News Live Update : यवतमाळमध्ये अल्पभूधारक युवा शेतकऱ्याचा मृत्यू

Mangalsutra Designs: 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा मंगळसूत्र, 5 डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये

15 Days Without Maida: 15 दिवस मैदा खाणं सोडलं तर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Soaked pomegranate: डाळिंबाचे दाणे १५ मिनिटं कोमट पाण्यात भिजवून खाल्ले तर काय होईल? हा उपाय वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT