SSC CGL Application Saam Tv
naukri-job-news

SSC CGL Application: तरुणांसाठी खुशखबर! स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल १७७२७ जागांची भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल? जाणून घ्या...

SSC CGL Application Last Date: कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. १७ हजारहून अधिक जागांसाठी ही भरती आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा घेण्यात येतात. कर्मचारी निवड आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे परीक्षा घेण्यात येते. जर तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर कर्मचारी निवड आयोगाने हजारो पदांसाठी भरती जाहीर केली आहे. SSC CGL अंतर्गत जवळपास १७ हजार हून अधिक जागांवर भरती करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

SSC CGL परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०२४ आहे. २४ जूनपासून कंबाइंट ग्रॅज्युएट लेव्हल (SSC CGL) भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर मल्टी टास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ (SSC MTS) भपतीसाठी या आठवड्यात अर्ज सुरु होण्याची शक्यता आहे.

SSC CGL साठी अर्ज करण्याची तारीख

SSC CGL परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२४ आहे. जर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची असेल किंवा फि भरायची असेल तर १० ऑगस्ट आणि ११ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. यासाठी टियर 1 ची संगणक आधारित परीक्षा (Computer Based Test) सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. तर टियर 2 ची परीक्षा डिसेंबर २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे.

या परीक्षेसाठी वयाची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८-३२ वर्ष असावे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी शिक्षण पूर्ण झाले असावे. याबाबत संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

SSC CGL भरती प्रक्रियेतून ग्रुप B आणि ग्रुप C पदे भरली जाणार आहेत. यात असिस्टंट अकाउंट ऑफिसर, इंस्पेक्टर, सब इंस्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, ऑडिटर टॅक्स असिस्टंट, अकाउंटंट या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Infection: किडनी इन्फेक्शनची ही लक्षणे ओळखा, वेळेवर उपचार न केल्यास होतील मोठे नुकसान

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Malegaon : बनावट जन्म दाखला प्रकरणी चौथा गुन्हा दाखल; महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

Krutika Deo: या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीची मालिकेत एन्ट्री, सुष्मिता सेनसोबतही केलंय काम

GK: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

SCROLL FOR NEXT