SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार स्टेट बँकेत नोकरी; पगार ९३,९६० रुपये; अर्ज कसा करावा?

SBI Deputy Manager Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

स्टेट बँकेत नोकरीची संधी

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

पगार ९३९६० रुपये मिळणार

सरकारी बँकेत नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी बँकेच्या परीक्षा द्यावा लागतात. परंतु तुम्हाला आता कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरी मिळणार आहे. स्टेट बँकेत भरती निघाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. तुम्हाला sbi.bank.in वेबसाइटवर सर्व माहिती मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २४ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे.

स्टेट बँकेत आयटी सिक्युरिटी एक्सपोर्ट, इमर्जिंग टेक्नोलॉजी, सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट, इंसिंडेंट मॅनेजमेंट आणि फॉरेन्सिक आणि टेस्ट इंजिनियर्स कॅडरमध्ये डेप्युटी मॅनेजरपदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

स्टेट बँकेत एकूण १२ पदांसाठी भरती होणार आहे. विविध विभागात ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.

पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक/ बी.ई / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग / सॉफ्टवेअर इंजिनियरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.

एमसीए किंवा एमटेक / कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएससी / कॉमप्युटर सायन्स आणि इंजिनियरिंग / सॉफ्टवेअर इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ४ वर्षांचा अनुभव असायला हवा.

या नोकरीसाठी २५ ते ३५ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ६४८२०-९३९६० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत मागील ११ दिवसांपासून डिझेल टंचाई कायम

LPG Price Today : सीएनजीसारखेच रात्रीत एलपीजी गॅसचे दर बदलले? घरगुती सिलिंडर बुक करण्याआधी दर वाचाच

FYJC Admission 2026: अकरावी प्रवेशाची पहिली यादी कधी जाहीर होणार? तारीख आली समोर

Pravin Tarde-Deool Band 2 : स्वामींचे तेजस्वी रूप पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध; 'देऊळ बंद २' सुसाट, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची ५ व्या दिवशी कमाई किती?

Onion: मातीमोल कांदा, खिशाला भुर्दंड; कांदा अजून किती दिवस शेतकऱ्याला रडवणार?

SCROLL FOR NEXT