SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: तयारीला लागा! स्टेट बँकेत ३५०० पदांसाठी भरती निघणार; समोर आली मोठी अपडेट

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लवकरच भरती जाहीर केली आहे. स्टेट बँकेत येत्या ५ महिन्यात ३५०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

स्टेट बँकेत नोकरीची संधी

पुढच्या ५ महिन्यात ३५०० पदांसाठी भरती

सरकारी नोकरीसाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पुढच्या काही महिन्यात हजारो पदांसाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे.

स्टेट बँकेत पुढील ५ महिन्यात ३५०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. स्टेट बँक लवकरच आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी करेन. sbi.bank.in वर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.

याबाबत डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर (एचआर) आणि चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर (CDO)किशोर कुमार पोलुदासु यांनी माहिती दिली आहे.

स्टेट बँकेने आयटी आणि सायबर सिक्युरिटीमध्ये याआगी १३०० रदांसाठी भरती जाहीर केली होती. पीओ लेव्हल पदासाठी भरती जाहीर केली आहे. ५४१ पदांसाठी ही भरती होणार आहे. याचसोबत स्टेट बँकेत ३००० सर्किल बेस्ड ऑफिसर पदांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

पात्रता

सर्किल बेस्ड ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. २१ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावे. या नोकरीसाठी उमेदवारांनी निवड ऑनलाइन परीक्षा, स्क्रिनिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. याचसोबत लँग्वेज प्रोफेशियंस टेस्ट केली जाणार आहे. दरम्यान, नवीन भरतीबाबत लवकरच अपडेट दिली जाईल.

स्टेट बँकेत नोकरी मिळावी म्हणून हजारो तरुण प्रयत्न करतात. स्टेट बँकेतील भरती दोन परीक्षेंद्वारे केली जाते. यासाठी प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा होणार आहे. यानंतर ऑफिसर पदासाठी इंटरव्हयू घेतले जातात. त्यानंतर नियुक्ती केली जाते. स्टेट बँकेत सरकारी नोकरी मिळाल्यानंतर तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आतापासूनच परीक्षेची तयारी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

Wednesday Horoscope : संकटातून यशस्वीपणे मार्ग काढाल; ५ राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार

SCROLL FOR NEXT