SBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

SBI Recruitment: स्टेट बँकेत नोकरीची संधी; १.३५ कोटींचं पॅकेज मिळणार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SBI Recruitment SCO Officer: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत सध्या स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. दरम्यान, स्टेट बँकेत सध्या भरती निघाली आहे. स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी तरुणांकडे आहे. स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. प्रोडक्ट हेडडपासून ते स्पेशलिस्ट अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. (State Bank Of India Recruitment)

स्टेट बँक ऑफ इंडियामधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २७ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी फॉर्म भरायचे आहेत. तुम्ही sbi.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. दरम्यान, या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०२५ आहे. तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी अजून २० दिवस आहेत.

स्टेट बँकेतील या भरती मोहिमेत १०३ पदे भरली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २५ ते ५० वयोगटातील असावे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

हेड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावी. त्यांना १५ वर्षांचा फायनान्शियल सर्व्हिस, फायनान्शियल प्रोडक्ट डेव्हलपमेंट यामध्ये अनुभव असावा. रिजनल हेड पदासाठी ग्रॅज्युएशन आणि १२ वर्षांचा अनुभव असावा. रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत संबंधित क्षेत्रात ८ वर्षांचा अनुभव असावा. इन्व्हेस्टमेंट ऑफिसर पदासाठी एमबीए, पीजीडीएम आणि ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

पगार

प्रोडक्ट, इन्व्हेस्टमेंट आणि रिसर्च हेड पदासाठी तुम्हाला वार्षिक CTC १ कोटी ३५ लाख रुपये मिळणार आहे. झोनल हेड पदासाठी ९७ लाख रुपये वार्षिक सॅलरी, रीजनल हेड पदासाठी ६६.४० लाखांचं पॅकेज मिळणार आहे. इन्व्हेस्टेमेंट स्पेशलिस्ट पदासाठी ४४.५० लाख पॅकेज, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर पदासाठी २७.१० लाखांचे पॅकेज तर सेंट्रल रिसर्च टीम पदासाठी २०.६० लाखांचं पॅकेज मिळणार आहे. या प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा आणि अनुभव वेगवेगळा आहे. याबाबत माहिती चेक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पॅराग्लायडिंग करताना अपघात; पायलट १३,५०० फूट उंचीवरून कोसळला

जलसंधारण आणि वृक्ष संवर्धनासाठी बदलापूरच्या तरुणांचा पुढाकार, जांभूळ ट्रस्टच्या माध्यमातून 2.5 कोटी लिटर पाण्याची साठवण

Thane To Amravati: विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवीच्या दर्शनाला जायचंय? ठाण्याहून अमरावतीला कसे जाल, जाणून घ्या सर्वोत्तम पर्याय

Doctor Case : मृत महिला डॉक्टरचा हॉटेलमधील पहिला CCTV व्हिडिओ समोर, रूममध्ये संपवलं होतं आयुष्य

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये भटके विमुक्त, बलुतेदार ओबीसी समाजाचा एल्गार महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

SCROLL FOR NEXT