आणखी एका पोलीस अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं, सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत: वर गोळी झाडली, धक्कादायक कारण समोर

Rajgir ASI Shoots Himself: बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील राजगीर पोलीस ठाण्यात एएसआय सुमन तिर्की यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं. कौटुंबिक कारणातून आत्महत्या केली असल्याचं प्राथमिक तपासातून उघड.
Rajgir ASI Shoots Himself
Rajgir ASI Shoots HimselfSaam
Published On
Summary
  • एएसआय पोलीस सुमन तिर्की यांनी स्वत:वर गोळी झाडली.

  • आत्महत्या करण्यामागचं कारण अस्पष्ट.

  • पोलीस विभागात खळबळ.

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील एका गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. राजगीर पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुमन तिर्की यांनी त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आत्महत्या का केली? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात घबराट पसरलीय.

राजगीर पोलीस ठाण्याच्या आवारातून ही घटना उघडकीस आली. सुमन तिर्की यांनी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रूग्णालयात पाठवले. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून सध्या तपास सुरू आहे.

Rajgir ASI Shoots Himself
अकोल्यात भाजपची मोठी खेळी, 'या' पक्षाला झटका; सलग २ वेळा विजयी झालेल्या नेत्याची भाजपात एन्ट्री

राजगीरचे डीएसपी सुनील कुमार यांनी सांगितले की, मृत एएसआय सुमन तिर्की हा झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील भटौली गावातील रहिवासी आहेत. गेल्या वर्षभरापासून राजगीरमध्ये ते तैनात होते. सुशील तिर्की यांचे पुत्र होते. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Rajgir ASI Shoots Himself
लग्नानंतर दुसरीवर जीव जडला, गर्लफ्रेंडकडून छळ, पंतप्रधानांना पत्र लिहून तरूणानं आयुष्य संपवलं

प्रथमदर्शनी या घटनेचे कारण कौटुंबिक वाद असल्याचे सांगितले जात आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पुढील तपास पोलिसांकडून केला जाईल. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com