अकोल्यात भाजपची मोठी खेळी, 'या' पक्षाला झटका; सलग २ वेळा विजयी झालेल्या नेत्याची भाजपात एन्ट्री

Major Setback for Vanchit Bahujan Aghadi: अकोल्यात वंजित बहुजन आघाडीला मोठा झटका. माजी नगरसेवकानं सोडली साथ. राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता.
Major Setback for Vanchit Bahujan Aghadi
Major Setback for Vanchit Bahujan AghadiSaam
Published On
Summary
  • अकोल्यात मोठी राजकीय उलथापालथ.

  • वंचित बहुजन आघाडीला झटका.

  • माजी नगरसेवकाची भाजप पक्षात एन्ट्री.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नेत्यांची लगबग सुरू असून, राजकीय वारे झपाट्यानं वाहू लागले आहेत. काही ठिकाणी फोडाफोडीची, तर काही ठिकाणी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आदेश दिल्यानंतर सर्वच पक्षांनी तयारीसाठी कंबर कसली आहे. अशातच अकोल्यात वंचित बहुजन आघाडीला मोठा झटका बसला आहे. काही प्रमुख नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

अकोल्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा झटका बसला आहे. महापालिकेत २०१२ आणि २०१७ असे सलग दोनदा नगरसेवक असलेल्या बबलू जगताप यांनी पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीला जय महाराष्ट्र करून भाजप पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.

Major Setback for Vanchit Bahujan Aghadi
वर्गात फटकारलं, विद्यार्थ्यांची सटकली; शिक्षकाच्या गर्भवती पत्नी अन् २ मुलींना संपवलं, दिवसा रक्तरंजित थरार

काल त्यांचा अधिकृतरित्या अमरावतीमध्ये भाजप पक्षात प्रवेश झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या विभागीय मेळाव्यात हा प्रवेशसोहळा पार पडला. या पक्ष प्रवेशामुळे काही कार्यकर्तेही उपस्थितीत होते.

Major Setback for Vanchit Bahujan Aghadi
निवडणुकीआधी महाविकास आघाडी फुटणार? काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा निर्णय? बैठकीत नेमकं काय घडलं?

जगताप हे १० वर्ष जठारपेठ-लहान उमरी भागातून विजयी होतायेत. जगताप यांनी वंचित बहुजन आघाडीची साथ सोडल्यामुळे त्यांना मोठा झटका बसला आहे. मात्र, त्यांच्या पक्ष प्रवेशाने या भागात भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com