Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

Samaj Kalyan Vibhag Bharti: तरुणांसाठी सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. समाद कल्याण आयुक्तालयात सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २९९ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

समाज कल्याण आयुक्तालयात लघुटंकलेखक (स्टेनो टायपिस्ट), लोवर ग्रेड स्टेनो, हायर ग्रेड स्टेनो, वॉर्डन, सोशल वेल्फेअर इन्स्पेक्टर, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेनो टायपिस्ट पदासाठी उमेदवाराने १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचसोबत त्याच्याकडे इंग्लिश आणि मराठी टंकलेखनाचे प्रमाणपत्र असायला हवे. (Government Job)

या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांनी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यानंतर उत्तीर्ण उमेदवरांची निवड केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १,००० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.या नोकरीसाठी तुम्हाला https://sjsa.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. ११ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (Samaj Kalyan Vibagh Bharti)

यूनियन बँक भरती

सध्या यूनियन बँकेतदेखील नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. यूनियन बँकेत १५०० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. लोकल बँक ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऑपरेशन नन्हे फरिश्तेअंतर्गत ४ वर्षीय हरवलेली मुलगी सुरक्षित आईकडे परत

Operation Akhal : रक्षाबंधनाच्या दिवशी २ जवान शहीद; ऐन सणासुदीत सैन्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

मोठी बातमी! जुन्या मंदिराची भिंत कोसळली; ७ जणांचा जागीच मृत्यू, ४ जण एकाच कुटुंबातले

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळ्याची आठवणही नाही राहणार, कोल्हापूरजवळचं 'हे' निसर्गरम्य ठिकाण देईल खरी मजा

Latur News : त्रास मुतखड्याचा उपचार किडनीचा; डॉक्टरांनी परस्पर किडनीच काढली रुग्णाचा दावा

SCROLL FOR NEXT