Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरी अन् ८०,००० रुपये पगार; स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Sports Authority Of India Recruitment 2024: तरुणांकडे सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये सध्या भरती सुरु आहे.

Siddhi Hande

स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्पोर्ट्स ऑथोरिटीमध्ये यंग प्रोफेशनल म्हणजेच ज्युनियर कंसल्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ८ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. तर ज्युनियर कन्सलटंट (इन्फ्रास्ट्रक्चर) पदासाठी अर्जप्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर असणार आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वप्रथम तुम्हाला स्पोर्ट्स ऑथोरिटीच्या अधिकृत वेबसाइट sportsauthorityindia.gov.in वर जाऊन अर्ज करा.

  • या वेबसाइटवर Apply Online Jobs वर क्लिक करा. त्यानंतर अर्ज वर क्लिक करा.

  • यानंतर अर्ज भरताना तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करुन घ्या. त्यानंतर तुमची सर्व माहिती भरुन अर्ज सबमिट करा. अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये एकूण ५२ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. त्यातील ५० पदे ही यंग प्रोफेशनल पदासाठी रिक्त आहेत. तर कंसल्टंट पदासाठी २ पदे आहेत.

या भरती मोहिमेत ज्युनिअर कंसल्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष असावी.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला ८०,२५० रुपये पगार मिळणार आहे.यंग प्रोफेशनल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३२ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ५० ते ७० हजार रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या गाडीवर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT