Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Bharti 2024: दहावी-बारावी पास उमेदवारांना रेल्वेत टीसी बनण्याची सुवर्णसंधी; तब्बल ११२५५ पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Indian Railway Recruitment 2024 For TC Post: रेल्वेत तिकीट तपासणीस या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. तब्बल ११२५५ जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. रेल्वे भरती मंडळाने तिकीट तपासणीस(TC) पदासाठी भरती सुरु आहे. याबाबत सर्व माहिती RRB च्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. यासाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. यासाठी एकूण ११२५५ पदे भरण्यात येणार आहे.

रेल्वेत काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. या नोकरीबाबत अधिसूचना या महिन्याच्या अखेरपर्यंत देण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तिकीट तपासणीस या नोकरीसाठी तुम्हाला २५००० ते ३४,४०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

रेल्वे भरती मंडळाने याबाबत कोणतीही अधिसूचना जाहीर केलेली नाही. परंतु या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. तर ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्षांची सूट देण्यात येईल.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतून पदवी प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येईल. त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात येईल. नंतर मुलाखतीचा राउंड होईल. या फेऱ्यांमध्ये पास झालेल्या उमेदवाराची या नोकरीसाठी निवड करण्यात येईल.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जाईल. सामान्य, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकडून ५०० रुपये फी घेतली जाईल. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांकडून २५० रुपये फी घेतली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

SCROLL FOR NEXT