RITES Recruitment  Saam Tv
naukri-job-news

RITES Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; RITES मध्ये भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

RITES Recruitment News: रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इंजिनियरिंग पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरी (Government Job) करण्याची संधी तुमच्याकडे आहे. RITES म्हणजे रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. तुम्हाला चांगल्या सरकारी विभागात नोकरी करायची ही उत्तम संधी आहे. RITES मध्ये विविध इंजिनियरिंग पदांसाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

ज्यांना सरकारी नोकरी करायची आहे. त्याचसोबत ज्यांनी इंजिनियरिंग केले आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिसमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी rites.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

राइट्समधील या नोकरीसाठी १८ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचे आहेत.

या पदांसाठी भरती

डेप्युटी जनरल मॅनेजर (सिविल-BLT स्पेशलिस्ट) , डेप्युटी जनरल मॅनेजर (परिवहन अर्थशास्त्री), डेप्युटी जनरल मॅनेजर सिव्हिल, सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल प्लानिंग), सहाय्यक व्यवस्थापक (हायड्रोग्राफिक सर्व्हेअर- सिव्हिल), सहाय्यक व्यवस्थापक (रेल्वे अलाइनमेंट डिझाइन), सहाय्यक व्यवस्थापक (GIS स्पेशलिस्ट ) या पदांसाठी ही भरती होणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. आर्क, बी.टेक/बीई, एमए (अर्थशास्त्र, वाहतूक नियोजन), एमई/ एमटेक आणि B.Plan पदवी असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवराची वयोमर्यादा ३२ ते ४१ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्कात सूट देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT