National Fertilizers Limited 
naukri-job-news

Job Recruitment: नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये Non-Executiveपदांसाठी भरती; 'या' तारखेपूर्वी करा अर्ज

National Fertilizers Limited : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडने नॉन-एग्जीक्यूटिव्ह पदांसाठी भरती जाहीर केलीय. त्यासाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.

Bharat Jadhav

जे उमेदवार नोकरीच्या शोधार्थ आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल फर्टिलाइजर्स लिमिटेडमध्ये नोकरी भरती केली जाणार आहे. यानुसार संस्थेत नॉन-एग्जीक्यूटिव्ह ही भरती होणार आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी अधिकृत वेबरसाईट nationalfertilizers.com वर जाऊन अर्ज करावा.

अर्जाची प्रक्रिया ०९ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झाली आहे. या मोहिमेसाठी उमेदवार ०८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवार येथे दिलेल्या चरणांचे अनुसरण करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये एकूण ३३६ पदे भरण्यात आली. ही पदे नॉन-एग्जीक्यूटिव्हची आहेत.

नॉन-एग्जीक्यूटिव्हच्या पदांसाठी अर्ज करताना यूआर, ईडब्ल्यूएस, आणि ओबीसी श्रेणीच्या उमेदवारांना २०० रुपयांचा अर्ज शुल्क आणि बॅकिंग चार्ज द्यावा लागेल. हे शुल्क नॉन-रिफंडेबल असेल. यामुळे अर्ज करण्याआधी उमेदवारांनी आपली पात्रता तपासून घ्यावी. ज्या उमेदवारांची पात्रता नसेल त्यांचे अर्ज बाद करण्यात येतील.

कसा कराल अर्ज

एनएफएल नॉन-एग्जीक्यूटिव्ह पदासाठी अर्ज करतांना उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, आत्ताचा फोटो, आणि संबंधित कागदपत्रे तयार करून ठेवा. उमेदवारांना कागदपत्रांची विशेष काळजी घ्यायची आहे, जर चुकूनही एखादं कागदपत्रं नसेल तरीही तुमचा अर्ज बाद करण्यात येईल. त्यामुळे अर्ज करण्याआधी पूरेपूर तयारी करा.

कधी आणि कसा कराल अर्ज

अर्जाची सुरुवात: ०९ ऑक्टोबर २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ नोव्हेंबर २०२४

अर्ज करणारे प्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.nationalfertilizers.comवर जावे.

त्यानंतर उमेदवारांनी होमपेजवरील "करिअर" विभागावर क्लिक करावे.

NFL रिक्रूटिंग लिंकवर क्लिक करा.

“Non-Executive Recruitment 2024” या लिंकवर क्लिक करा.

नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा.

आवश्यक तपशील भरा, फी भरा आणि अर्ज सबमिट करा.

शेवटी उमेदवारांनी पुढील आवश्यकतेसाठी अर्जाची प्रिंट आउट काडून आपल्यासोबत ठेवावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT