RBI Recruitment Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार थेट RBI मध्ये नोकरी; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

RBI Recruitment 2024: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. रिझर्व्ह बँकेत सध्या मेडिकल कंसल्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रिझर्व्ह बँकेसारख्या मोठ्या कंपनीत तुम्हाला काम करायला मिळणार आहे. आरबीआयने सध्या काही पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सध्या मेडिकल कंसल्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Reserve Bank Of India Job)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. मेडिकल कंसल्टंट पदासाठी पात्रता काय आहे ते जाणून घेऊया.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अॅलोपॅथी मेडिकल सिस्टीममध्ये एमबीबीएस केलेले असावे. तसेच जनरल मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे २ वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा. (RBI Recruitment 2024)

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी त्यांना वेबसाइटवरुन अर्जाचा नमुना डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर तो भरुन आणि काही आवश्यक कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्त्यावर पाठवावी लागणार आहे.प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भरती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पाटणा-८००००१ येथे पाठवायचा आहे. (Government Job)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : शरद पवार आणि अजित पवार दोघेही आमचेच - अण्णा बनसोडे

Vaidehi Parashurami : दिवाळीनिमित्त वैदेहीने दिल्या चाहत्यांना खास शुभेच्छा

दिवाळीपूर्वी तुमच्या किचनमधून बाहेर काढा 'या' गोष्टी, आर्थिक संकट येणार नाही

'टायपिंग मिस्टेक'च्या विधानावर पटोलेंचा राऊतांवर पलटवार; बघा पटोलेंनी काय सल्ला दिला

Nikki Tamboli: बाईsss! निक्की अन् सूरजची होणार लवकरच भेट, फोनवर असं काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT