९ तासांची नोकरी करूनही तुम्ही इतके कमावणार नाही, भिकाऱ्याची महिन्याची कमाई ऐकून येईल चक्कर!

तुम्ही पैसे देत असलेले हे भिकारी तुमच्यापेक्षाही श्रीमंत आहेत. तुम्हाला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसेल. लखनऊमध्ये असलेल्या भिकाऱ्यांकडे स्मार्टफोन आणि पॅनकार्ड मिळालं आहे.
Indian Beggar
Indian Beggarsaam tv
Published On

येता-जाता रस्त्यावर आपल्याला अनेक भिकारी लोकं दिसतात. त्यांच्यावर दया येऊन आपण त्यांना ५-१० रूपये देतो. मात्र तुम्हाला माहितीये का, तुम्ही पैसे देत असलेले हे भिकारी तुमच्यापेक्षाही श्रीमंत आहेत. तुम्हाला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र लखनऊमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार, लखनऊमध्ये असलेल्या भिकाऱ्यांकडे स्मार्टफोन आणि पॅनकार्ड मिळालं आहे.

लखनऊमध्ये भिकाऱ्यांना जेरबंद करण्याची मोहीम हाती घेण्यात आली त्यानुसार, हे सर्व्हेक्षण करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक भिकाऱ्यांचे सरासरी महिन्याचं उत्पन्न 90 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत असल्याचं समोर आलं आहे. याचाच अर्थ या भिकारी व्यक्तींचं वार्षिक उत्पन्न सुमारे 12 लाख रुपये आहे. सर्वेक्षणादरम्यान लखनऊमध्ये ५३१२ भिकारी आढळून आलेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमध्ये भिकाऱ्यांची संख्या सातत्याने वाढताना दिसतेय. समाज कल्याण विभाग आणि DUDA यांनी एक सर्वेक्षण केलं. ज्यामध्ये ५३१२ भिकारी आढळले असून त्यांची कमाई ही दररोज कष्ट आणि नोकरी करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे. लहान मुलांना हातात घेऊन भीक मागणाऱ्या गर्भवती महिलांची रोजची कमाई प्रत्येकी ३,००० रुपयांपर्यंत आहे. वृद्ध आणि लहान मुलं 900 रुपयांपासून ते 1.5-2 हजार रुपये कमवत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

या प्रकल्पाचे अधिकारी सौरभ त्रिपाठी यांनी माहिती दिली की, आम्ही अनेक दिवसांपासून परिसराचे सर्वेक्षण करत आहेत. यामध्ये काहीजण बळजबरीने भीक मागतायत. तर यातील 90% पूर्वीपासून हे काम करतायत.

भिकारी व्यक्तींकडेही स्मार्टफोन

या भिकाऱ्यांचं उत्पन्न समजल्यानंतर अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांच्या म्हणण्यानुसार,, बाराबंकीच्या लाखपेडाबागमधील राहणारा भिकारी अमन याच्याकडे स्मार्टफोनपासून ते इतर गोष्टींपर्यंत सर्व काही आहे. त्याचं पॅनकार्डही बनवण्यात आलंय. मात्र, आता सर्वांचं कार्ड बनवून ते सरकारी योजनेशी जोडले जाणार आहेत.

सर्व्हेमधून काय गोष्टी आल्या समोर?

सर्वेक्षणानुसार, लखनऊचे लोक दररोज सरासरी ६३ लाख रुपये भिकाऱ्यांना देत असल्याचं समोर आलंय. लखनऊ महानगरपालिका, समाजकल्याण विभाग आणि DUDA यांच्या सर्वेक्षणात राजधानी लखनऊमध्ये एकूण 5312 भिकारी आढळलेत. या भिकाऱ्यांच्या उत्पन्नाबाबत सर्वेक्षणात असं समोर आलंय की, ते दररोज सरासरी तीन हजार रुपयांपर्यंत कमाई करतायत. इतकंच नाही तर कमाईच्या बाबतीत स्त्रिया या पुरुषांच्या पुढे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com