Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ९०४ पदांसाठी होणार भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे रेल्वेत ९०४ अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

रेल्वेत सरकारी नोकरीची करण्याची अनेकांची इच्छा असते. रेल्वेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. दक्षिण रेल्वेत सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण रेल्वेत ९०४ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

अर्ज कधीपर्यंत करता येणार? (Railway Recruitment Application Last Date)

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी रेल्वे रिक्रुटमेंट सेल हुबलीच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे rrchubli.in जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०२५ आहे.

रेल्वेतील या भरतीसाठी उमेदवारांची निवड मॅट्रिकुलेशनमध्ये मिळालेल्या गुणांवर केली जाणार आहे. याचसोबत आयटीआयमध्ये मिळालेल्या मार्कांवर मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार आहे. रेल्वेतील या नोकरीसाठीचा ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षांसाठी असणार आहे.

हुबली डिवीजनमध्ये १२५ पदे भरती केली जाणार आहे. कैरिज रिपेअर वर्कशॉप हुबलीमध्ये ११२ पदे, बंगळुरु डिविजनमध्ये ११२ पदे, म्हैसूर डिवीजनमध्ये ९१ पदे, सेंट्रल वर्कशॉप मैसूर येथे २३ पदे भरती केले जाणार आहेत.

या पदांसाठी होणार भरती

फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर मेकॅनिक, प्रोग्राम अँड सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, मशीनिस्ट, टर्नर, कारपेंटर, पेंटर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून १०वी आणि १२वीची परीक्षा पास केलेली असावी. याचसोबत संबंधित क्षेत्रात सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT