Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: १०वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; ६२३८ पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

RRB Railway Technician Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या ६२३८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत १०वी पास आणि आयटीआय उमेदवारांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने टेक्निशियन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तुम्ही rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन इतर माहिती मिळवू शकतात.

रेल्वेतील ही भरती ६२३८ पदांसाठी होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२५ आहे. तुम्ही ३० जुलैपर्यंत अर्जाची फी भरु शकतात. जर तुम्हाला फॉर्म एडिट करायचे असेल तर १० ऑगस्टपर्यंत करु शकतात.

रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, रेल्वे टेक्निशियन भरती मोहिमेत टेक्निशियन ग्रेड १ सिग्नल पदासाठी १८३ रिक्त जागा आहेत. टेक्निशियन ग्रेड III पदासाठी ६०५५ रिक्त जागा आहेत.टेक्निशियन ग्रेड III २१०६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पात्रता (Eligibility)

या नोकरीसाठी उमेदवारांनी इंजिनियरिंगमध्ये बीई/बी.टेक, इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा बी.एससी पदवी प्राप्त केलेली असावी. टेक्निशियन ग्रेड III पदासाठी उमेदवारांनी आयटीआय प्रमाणपत्र आणि १०वी पास असणे गरजेचे आहे किंवा पीसीएम विषयात १२वी पास असणे गरजेचे आहे.

टेक्निशियन ग्रेड I पदासाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. टेक्निशियन ग्रेड III पदासाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

टेक्निशियन ग्रेड I पदासाठी २९,२०० रुपये पगार मिळणार आहे. टेक्निशियन ग्रेड III पदासाठी लेव्हल २ नुसार १९,९०० रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कसा करावा? (How To Apply For Railway Recruitment)

तुम्ही rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.

यानंतर CEN No. 02/2025 - टेक्नीशियन भरती 2025 यावर क्लिक करा.

यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि अॅप्लिकेशन फॉर्म भरा.

यानंतर कागदपत्रे अपलोड करा आणि अॅप्लिकेशन फी भरा.

यानंतर फॉर्म सबमिट करा आणि डाउनलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती

Parbhani Accident : मध्यरात्री परभणीत भीषण अपघात, ट्रक अन् ऑटोच्या धडकेत ३ ठार, ४ जखमी

Shocking: जंगलात ओढत नेत मुलीवर सामूहिक बलात्कार, नराधमांच्या तावडीतून पळाली; पण ट्रक चालकानेही अंगाचे लचके तोडले

धक्कादायक! एस्केलेटरमध्ये अडकलं तरुणाचं डोकं; VIDEO पाहून अंगावर शहारा येईल

PMC Recruitment: इंजिनियर झालात? पुणे महानगरपालिकेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT