Post Office Recruitment Saam Tv
naukri-job-news

Post Office Recruitment: परीक्षा नाही थेट पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरी; अर्ज कसा करावा?

Post Office Recruitment 2025: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. टेक्निकल सुपरवायजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पोस्ट ऑफिसमध्ये टेक्निकल सुपरवायजर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. इच्छुक उमेदवार indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (Post Office Recruitment)

भारतीय डाक विभागात सुपरवायजर पदावर काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

डाक विभागातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २२ ते ३० वर्षे असावे.नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनियरिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा केलेला असावा.याचसोबत कोणत्याही ऑटोमोबाईल फर्ममध्ये दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

पोस्ट ऑफिसमधील या भरतीमध्ये निवड झाल्यास उमेदवाराला ७ व्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना ट्रेड टेस्टमध्ये सहभागी व्हावे लागेल.या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी फॉर्म आणि कागदपत्रे स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहेत. तुम्हाला हा अर्ज सीनियर मॅनेजर, मेल मोटर सेवा, कोलकाता, १३९, बेलेघाटा रोडा, कोलकाता-७०००१५ येथे अर्ज पाठवायचा आहे.

एक्झिम बँकेत भरती

सध्या एक्झिम बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी, डेप्युटी मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२५ आहे. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला चांगला पगारदेखील मिळणार आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्...;

SCROLL FOR NEXT