Post Office Recruitment Saam Tv
naukri-job-news

Post Office Recruitment: खुशखबर! १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; पोस्ट ऑफिसमध्ये निघाली भरती; अर्ज कसा करावा?

Post Office Recruitment 2025: पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १०वी पास तरुण या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १०वी पास तरुणांना इंडिया पोस्ट ऑफिसरमध्ये नोकरी करण्याची संधी आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. भारतीय डाक विभागात स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. (Post Office Recruitment)

इंडिया पोस्ट ऑफिसच्या या नोकरीसाठी तुम्ही indiapost.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या भरती मोहिमेत २५ पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख८ फेब्रुवारी २०२५ आहे. मुदतीपूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.(Post Office Recruitment 2025)

स्टाफ ड्रायव्हर पदासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये भरती केली जाणार आहे. मध्य क्षेत्रात १ पदासाठी भरती केली जाणार आहे. दक्षिण भागात ४ पदांसाठी, पश्चिम भागात ५ पदांसाठी, चेन्नईत १५ पदांसाठी अशी एकूण २५ जागांसाठी भरती केली जाणार आहे.

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत हलक्या आणि वजनदार वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असावी.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला १९९०० रुपये पगार दिला जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रे ऑफिस ऑफ सिनियर मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, नंबर ३७, ग्रीम्स रोड, चेन्नई ६००००६ येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT