Post Office Recruitment Google
naukri-job-news

Post Office Bharti: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; पोस्ट ऑफिसमध्ये भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Post Office Recruitment 2025: भारतीय पोस्ट ऑफिसरमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पोस्ट ऑफिसमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडिया पोस्ट म्हणजे डाक विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.

भारतीय डाक विभाग स्टाफ कार चालक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १०वी पास तरुण या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पाहा. भारतीय डाक विभागाने या नोकरीबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. (Post Office Recruitment)

१८ ते २७ वयोगटातील तरुण या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हलक्या आणि जड वाहने चालवण्याचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. ७ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.इंडिया पोस्ट सर्कल बिहार येथे ही भरती केली जाणार आहे. (Post Office Recruitment 2025)

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुख्य पोस्टमास्टर जनरल, बिहार सर्कल, पटना,८००००१ आणि सहाय्यक संचालक,मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय,बिहार सर्कल येथे अर्ज पाठवायचा आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १९९०० रुपये पगार मिळणार आहे.

स्टेट बँकेत भरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्येही सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. १५० रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT