
सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सध्या सेक्रेटरी पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. (PGCIL Recruitment)
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२५ आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी powergrid.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने २५ डिसेंबर २०२४ रोजी या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर केली होती. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावेत.२५ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. (PGCIL Recruitment 2025)
या नोकरीसाठी अर्ज करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना फॉर्ममध्ये सर्व माहिती अचूक भरा. जर तुम्ही काही चुकीची माहिती भरली तर तुमचा फॉर्म अप्रुव्ह केला जाणार नाही. या नोकरीबाबत अधिक माहिती तुम्ही वेबसाइटवर जाऊन चेक करु शकतात.
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम तुम्ही powergrid.in या वेबसाइटवर जा. त्यानंतर करिअर सेक्शनवर जा. यानंतर पीजीसीआयएल कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल भरती २०२४ या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर आवश्यक माहिती आणि शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.