Government Job Saam Tv
naukri-job-news

OICL Recruitment: सरकारी इन्श्युरन्स कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

OICL Recruitment 2025: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ओआयसीएल या इन्श्युरन्स कंपनीत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

  • सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी

  • OICL या इन्श्युरन्स कंपनीत भरती जाहीर

  • परीक्षेद्वारे होणार उमेदवारांची निवड

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सरकारी कंपनीत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी इन्श्युरन्स कंपनी (OICL) मध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

सरकारी इन्श्युरन्स कंपनीतील या नोकरीसाठी एकूण ५०० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २ ऑगस्ट २०२५ पासून सुरु होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी उद्यापासून अर्ज करावेत. चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

इन्श्युरन्स कंपनीत नोकरी करण्याची संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी आधी अधिसूचना वाचा त्यानंतर पात्रकेनुसार अर्ज करावेत.

या नोकरीसाठीची अर्जप्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. तुम्हाला orientalinsurance.org.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. उमेदवारांची दोन टप्प्यांमध्ये परीक्षा होणार आहे. ही परीक्षा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते.

या नोकरीसाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. याचसोबत १२वीत ६०पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावे. तसेच उमेदवारांना त्यांच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी अधिसूचना आज जाहीर केली आहे.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करताना orientalinsurance.org.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर Apply Online वर क्लिक करा.

New Registration या ऑप्शनवर क्लिक करुन सर्व माहिती भरा.

यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे.

आवश्यक कागदपत्रे आणि फोटो अपलोड करायचा आहे.

यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून तुम्ही तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीपात्रात पुन्हा मळी मिश्रित पाणी सोडण्याचा प्रकार समोर

Narali Bhat Recipe: या नारळी पौर्णिमेला नक्की बनवा झटपट टेस्टी नारळी भात रेसिपी

Akola : अकोला पोलिसात खळबळ; कारवाई टाळण्यासाठी मागितली खंडणी, पोलिसांसह सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल

Sanjay Shirsat : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचं वक्तव्य चर्चेत

Pune Crime : कॅफेमधील 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी; ब्लॅकमेलिंगला कंटाळून २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या

SCROLL FOR NEXT