NTRO Recruitment Saam Tv
naukri-job-news

NTRO Recruitment: नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता फक्त पदवीधर; अशा पद्धतीने करा अर्ज

NTRO Recruitment 2024: नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. एनटीआरओमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. याबाबत अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनद्वारे ७० पेक्षा जास्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट पदासाठी रिक्त जागा आहेत.

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमंध्ये वैज्ञानिक बी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या नोकरीसाठी पे स्केल १०नुसार वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी ७५ पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी तुम्ही १० ऑक्टोबरपासून अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२४ आहे.

या नोकरीबाबत सर्व माहिती ntro.gov.in या साइटवर देण्यात आली आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. याबाबत अधिक माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्याची कमाल वयोमर्यादा ३० वर्ष आहे. तसेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. (NTRO Recruitment)

NTRO वैज्ञानिक बी पदासाठी तुम्ही फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला recruit-ndl.neilit.gov.in या वेबसाइटवर जाऊन मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून लॉग इन करावे लागेल.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. त्याचसोबत उमेदवारांची मुलाखतदेखील घेतली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT