NTPC Job Saam Tv
naukri-job-news

NTPC Job: NTPC मध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी;'या' पदासाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सर्वकाही

NTPC Recruitment 2024: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची चांगली संधी आहे. एनटीपीसीमध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. एनटीपीसीमध्ये ज्यूनियर एक्झिक्यूटिव्ही (बायोमास) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

एनटीपीसीमधील या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट ntpc.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२४ आहे. (NTPC Recruitment)

एनटीपीसीमध्ये ५० रिक्त जागांवर ही भरत केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून अॅग्रीकल्चर सायन्समध्ये B.Sc पदवी प्राप्त केली असावी.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २७ वर्ष असणे गरजेचे आहे. त्याचसोबत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. (NTPC Recruitment 2024)

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्जसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४०,००० रुपये पगार मिळणार आहे.

एनटीपीसीमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT