Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? रेल्वेमध्ये ४०९६ पदांसाठी सुरु आहे भरती;पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Siddhi Hande

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. तुमचीही रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आंनदाची बातमी आहे. उत्तर रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. उत्तर रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. तब्बल ४०९६ जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

उत्तर रेल्वेच्या या भरतीसाठी अर्जप्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीक १६ सप्टेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीची जाहिरात अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, कॉम्प्युटर ऑपरेटर, मेक्रनिक मोटर व्हेईकल अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती जाहीर केलेली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून १०वी पास तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI केलेला असावा.

या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. १५ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. नोकरीसाठी अर्ज करताना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. अर्जासोबतच उमेदवाराने त्याचे सर्व महत्त्वाचे कागदपत्र अपलोड करायची आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT