NCERT Recruitment Saam Tv
naukri-job-news

NCERT Recruitment: कोणत्याही परीक्षेशविाय मिळणार NCERT मध्ये नोकरी; पगार १.४४ लाख; अर्ज कुठे अन् कसा करावा?

NCERT Recruitment 2026: एनसीईआरटीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनसीईआरटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

NCERT मध्ये नोकरीची संधी

प्रोफेसर पदांसाठी भरती

पगार मिळणार १.४४ लाख रुपये

जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच NCERT ने भरती जाहीर जाहीर केली आहे. प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे चांगल्या ठिकाणी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

एनसीईआरटीमध्ये मॅथ्स, आर्ट एज्युकेशन, इकोनॉमिक्स, हिंदी, इतिहास, पॉलिटिकल सायन्स, इंग्रजी, उर्दू अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ३१ जानेवारी २०२६ पासून अर्ज करु शकतात. तुम्हाला ncert.nic.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

या पदांसाठी भरती

एनसीईआरटीमध्ये मॅथ्स, आर्ट एज्युकेशन, बायो सायन्य, ज्यूलॉजी, एज्युकेशन, सायन्स, सायकोलॉजी, पॉप्युलेशन स्टडीज, इंग्रजी, उर्दू, सोशिओलॉजी, होम सायन्स, कॉम्प्युटर एज्युकेशन अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात येणार आहे.११७ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

एनसीइआरटीची ही भरती ३१ जानेवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

पगार

प्रोफेसर पदासाठी उमेदवारांना १,४४,२०० रुपये पगार मिळणार आहे. असोसिएट प्रोफेसर पदासाठी १,३१,४०० रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ५७,७०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पीएचडी केलेली असावी. याचसोबत १० वर्षांचा प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करण्याचा अनुभव असायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Superfoods For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी हे 5 पदार्थ नक्की खा

Health Care : ग्लोइंग स्कीनसाठी प्या पपई स्मूदी; जाणून घ्या फायदे

महाराष्ट्राचे आमदार लंडनच्या दौऱ्यावर, कोण कोणत्या नेत्यांचा समावेश, पाहा यादी

Dashank Yog: 30 वर्षांनंतर शनी बनवणार दशांक योग; या राशींच्या तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस

Nigeria Terror Attack : नरसंहार! रक्ताच्या नद्या वाहिल्या; दहशतवाद्यांनी १६२ जणांना संपवलं, क्रूरतेने जग हादरलं

SCROLL FOR NEXT