National Housing Bank Recruitment Saam Tv
naukri-job-news

National Housing Bank Recruitment: राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत ४८ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल? जाणून घ्या सविस्तर माहिती

National Housing bank Recruitment 2024: राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेने वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ४८ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत भरती जाहीर केली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. जर तुम्हालाही बँकेत किंवा फायनान्स क्षेत्रात काम करायचे असेल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. नॅशनल हाउसिंग बँकेने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार बँकेत भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी २९ जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

या भरती मोहिमेत वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये महाव्यवस्थापक (Senior Administrator), उपमहाव्यवस्थापक, मुख्य अर्थतज्ज्ञ (Chief Economist) अशा अनेक पदांसाठी रिक्त जागा आहेत. त्यामुळे जर तुम्हाला या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर अर्ज करा.

बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भरती मोहिमेत २३ नियमित पदे आणि २५ कंत्राटी पदे भरण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती नॅशनल हाउसिंग बँकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला nhb.org.in वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर होमपेजवर क्लिक करुन भरतीवर क्लिक करा. यानंतर तुमची सर्व माहिती भरुन अर्ज सबमित करा. यानंतर तुमचे कागदपत्रे अपलोड करा. या अर्जाची तुम्ही प्रिंट काढू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२४ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT