Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी नोकरी; पगार १,४०,००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

NALCO Recruitment 2026: भारत सरकारची कंपनी नालकोमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या कंपनीत इंजिनियर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरीची संधी

नालको कंपनीत भरती सुरु

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नालको कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नालको म्हणजे नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO). ही भारत सरकारची कंपनी आहे. सरकारच्या नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील पीएसयू कंपनी आहे. ही कंपनी अॅल्युमिनियम उत्पादनाचे काम करते.

इंजिनियर पदासाठी भरती

नालको कंपनीत ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मेकॅनिकल इंजिनियरसाठी ५९ जागा आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी २७ तर केमिकल इंजिनियरसाठी २४ जागा आहेत. एकूण ११० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

सरकारी कंपनीतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २ जानेवारीपासून सुरु झाली आहे. या योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी या कालावधीत nalcoindia.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

पगार (Salary)

नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमधील नोकरीसाठी निवड झाल्यावर ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. उमेदवारांची निवड GATE-2025 स्कोअरवर आधारित होणार आहे. यानंतर शॉर्टलिस्टेड उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून फुल टाइम मेकॅनिकल इंजिनियरिंग ,इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग/पॉवर इंजीनियरिंग/इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग/केमिकल इंजीनियरिंग/एमटेक डिग्री प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे स्कोअरकार्डदेखील असावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT