NABARD Job Saam Tv
naukri-job-news

NABARD Recruitment: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी, या पदांसाठी होणार भरती, अर्ज कसा करावा?

NABARD Recruitment 2025: नाबार्डमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. मेडिकल ऑफिसर पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

नॅशनल अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हपमेंट बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. चांगल्या सरकारी विभागात ही नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नाबार्डने बीएमओ (बँक मेडिकल ऑफिसर)पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीबाबत सविस्तर माहिती nabard.org या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे.

नाबार्ड बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

पात्रता (Eligibility)

नाबार्डमधील या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवाराकडे एमबीबीएस (MBBS) पदवी प्राप्त केलेली असावी. ही पदवी भारतीय चिकित्सा परिषद (MCI)द्वारे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त केलेली असावी.उमेदवारांनी जनरल मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे.

नाबार्डमधील बँक मेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ७० वर्षे असावी. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.नाबार्डमधील या नोकरीसाठी अर्ज करताना कोणतेही शुल्क भरायचे नाही.

अर्ज कसा करावा? (NABARD Application Process)

या नोकरीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. याबाबत सविस्तर माहिती nabard.org वरील अधिसूचनेत देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.तुम्हाला अर्ज चीफ जनरल मॅनेजर, नाबार्ड, पश्चिम बंगाल रिजनल ऑफिस, नाबार्ड भवन, प्लॉट नंबर २, डीपी ब्लॉक, स्ट्रीट ११, सेक्टर V, सॉल्ट लेक, कोलकत्ता येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT