Bombay High Court Job Saam tv
naukri-job-news

Bombay High Court Job: मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांची भरती, तब्बल ५७ हजार मिळणार पगार, शिक्षणाची अट काय?

Siddhi Hande

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत मानधनाच्या नियमांनुसार ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. सरकारी विभागात चांगली नोकरी मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

मुंबई उच्च न्यायलयाद्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.राज्य सरकारद्वारे ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५७,५०० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

या नोकरीसाठी २५ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही संधी आहे. महाव्यवस्थापक या पदासाठी नोकरीचा संधी आहे. या नोकरीसाठी एमबीए किंवा डिप्लोम पदवी असणे आवश्यक आहे.त्यांना ५ वर्षांचा अनुभव आणि प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन, आयटी व्यवस्थापन,एचआर याचे शिक्षण झाले असावे. सरकारी संस्था किंवा प्रतिष्ठित कंपनीत कामाचा किमान ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवाराकडे कायद्याची पदवी आहे त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल. यासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत पात्र ठरल्यानंतर १०० गुणांच्या व्हिवासाठी बोलावले जातील. याबाबत सर्व माहिती उच्च न्यायालयाचे अधिकृत वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल. ९ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT