MPSC Recruitment Saam Tv
naukri-job-news

MPSC Recruitment : 'एमपीएससी'कडून PSIच्या पदांसाठी मेगाभरती जाहीर; अर्जप्रक्रिया कधी सुरु होणार? वाचा सविस्तर माहिती

MPSC Recruitment 2025: 'एमपीएससी'कडून PSIच्या पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आलीये. या परीक्षेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

Vishal Gangurde

MPSC Group B Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीये. 'एमपीएससी'च्या गट ब सेवांसाठी संयुक्त पूर्व परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. ही परीक्षा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावर होणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विविध विभागातील २८२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर भरती प्रक्रियेतून पोलीस उपनिरीक्षक पदांच्या एकूण ३९२ जागांचा समावेश आहे.

'एमपीएससी'ने जाहीर केलेल्या भरतीप्रक्रियेतून आधीच्या २८२ आणि आता नव्याने समावेश झालेल्या ३९२ मिळून ६७४ जागा भरल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी १ ऑगस्टपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे. 'एमपीएससी'च्या महाराष्ट्र गट - ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 असणार आहे.

गट - ब ची जाहिरातीत 'पीएसआय'च्या जागा नसल्याने हजारो उमेदवार निराश झाले होते. त्या जाहिरातीत 282 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यामुळे हजारो उमेदवार नाराज झाले होते. आता या भरतीत गट ब च्या 393 जागाचा समावेश केल्याने हजारो उमेदवारांना मुख्य परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

शैक्षणिक अर्हता?

विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता असणे गरजेची असेल.

यावर्षी पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असणार आहेत. या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे.

इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असणाऱ्या पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.

मराठी भाषेचे ज्ञान देखील आवश्यक असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डबेवाल्यांना मुंबईत मिळणार हक्काचा निवारा

AI Love Story : तरुणी AI चॅटबॉटच्या प्रेमात आंधळी; 5 महिन्यांच्या डेटिंगनंतर गुपचूप उरकला साखरपुडा

Stomach Infection: पोटात इन्फेक्शन असेल तर दिसतात 'ही' लक्षणं

Shocking : २ वर्षांपूर्वी भरती; भाईंदरमध्ये नेमणूक, अवघ्या २४ वर्षांच्या पोलिसानं मृत्यूला कवटाळलं

Ajit Pawar: मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे- अजित पवार नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT