Government Job Google
naukri-job-news

Government Job: महाराष्ट्र सुरक्षा महामंडळात मोठी भरती; कोणत्या जागा? अटी-शर्ती काय? जाणून घ्या सर्व प्रोसेस

Maharashtra Maha Security Bharti: महाराष्ट्र सुरक्षा महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी आहे. पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात शासनात नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात ७ जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. १८ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच मराठी आणि इंग्रजी टायपिंग येणे गरजेचे आहे. MSCIT प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

२५ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५,००० ते ३५,००० रुपये पगार मिळणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२४ आहे.

सध्या रेल्वेतदेखील भरती सुरु आहे. रेल्वेत ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT