HRRL Recruitment
HRRL RecruitmentSaam Tv

HRRL Recruitment: सरकारी कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी; मिळणार १,६०,००० रुपये पगार; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

HRRL Recruitment 2024: तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. HRRL कंपनीत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे.
Published on

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड (HRRL) मध्ये नोकरीसाठी भरती सुरु आहे. HRRL मध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट आणि इंजिनियर पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवार hrrl.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

HRRL मध्ये नोकरीसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्जपक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीआधी वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

राजस्थान रिफायनरी लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचा हा एकत्र उपक्रम आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरीची चांगली संधी मिळणार आहे. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह फायर अँड सेफ्टी, ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल, असिस्टंट अकाउंट ऑफिसर, असिस्टंट इंजिनियर- केमिकल प्रोसेस, केमिकल इंजिनियर अशा अनेक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. तब्बल १०० जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयात ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. असिस्टंट अकाउंट ऑफिसर पदासाठी सीए , इंजिनियर पदवी प्राप्त असावी. असिस्टंट इंजिनियर पदासाठी ४ वर्षांचा B.E/B.Tech पदवी प्राप्त असावी. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

HRRL Recruitment
Google Jobs In India: गुगलमध्ये नोकरी पाहिजे? काय आहे शैक्षणिक पात्रता अन् कशी मिळेल संधी? वाचा महत्वाची माहिती

पगार

या नोकरीसाठी २५ ते २९ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. नोकरीसाठी ३०,००० ते १,६०,००० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, स्किल टेस्ट आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

HRRL Recruitment
Teachers Recruitment: राज्य सरकारला दणका! 'शिक्षक भरतीतील ७००० शिक्षकांना कायमस्वरुपी नोकरी द्या', हायकोर्टाचे आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com