Mukhyamantri Yojana Doot Saam TV
naukri-job-news

Mukhyamantri Yojana Doot : गावागावात तरुणांची नोकरी पक्की; शिंदे सरकारकडून ५०,००० जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

Maharashtra Government Jobs 2024 : राज्यात शिंदे सरकारकडून योजनादूत या पदासाठी ५०,००० जागांवर भरती सुरू आहे. आज आम्ही तुम्हाला या योजनेसाठी कसे अप्लाय करायचे याची माहिती सांगणार आहोत.

Ruchika Jadhav

तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठी मेगा भरती काढण्यात आली आहे. या भरतीमध्ये योजनादूत निवडले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात असाल तर या योजनेसाठी अर्ज करू शकता.

योजनादूत म्हणजे काय?

योजनादूत हे पदाचे नाव आहे. या पदासाठी गावागावांत एका व्यक्तीची निवड केली जाणार आहे. सदर उमेदवाराला शासनाकडून दर महा १०,००० रुपये इतकं मानधन सुद्धा दिलं जाणार आहे. नियुक्तीचा कालावधी ६ महिने असणार आहे. महाराष्ट्र शासनासह हे काम केल्यावर याचे एक प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला मिळेल.

काम काय करावे लागेल?

या योजनेत काम करण्यासाठी संबंधित उमेदवाराला सरकारने नागरिकांसाठी ज्या काही योजना सुरू केल्या आहेत त्याची माहिती घरोघरी पोहचवायची आहे. गावातील सर्व व्यक्तींना योजनांचा कशा पद्धतीने लाभ घेता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचे आहे. घरोघरी जाऊन लोकांना योजनांची माहिती देण्यापासून त्यांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत मदत करायची आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

रहिवासी दाखला

पदवी प्रमाणपत्र

संगणक प्रमाणपत्र (MSCIT)

अर्ज कसा करायचा?

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला mahayojanadoot.org या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. येथे तुम्ही सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

सदर योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्ही १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची दिनांक आहे. या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: रस्त्यावर बसची दहशत! वाऱ्याच्या वेगात आली अन् वाहनाचा झाला चुराडा; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

वाह, भाई वाह! डोळ्यांवर गॉगल अन् सुटाबुटात Abhijeet Sawant चा स्वॅग न्यारा, भन्नाट डान्सचा VIDEO पाहा

Maharashtra News Live Updates: सोलापूरमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का

Nashik Crime: नाशिकमध्ये मनसेत राडा, उमेदवाराने पदाधिकाऱ्याच्या घरी टाकला दरोडा; गुन्हा दाखल

IND A vs AUS A: ऑस्ट्रेलियाकडून भारताचा सुपडा साफ, २-० ने दारुण पराभव, ध्रुव जुरेल एकटा लढला!

SCROLL FOR NEXT