Zilla Parishad Job Saam Tv
naukri-job-news

Zilla Parishad Job: कोल्हापूरकरांनो,जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी, पात्रता १२वी पास, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Kolhapur Zilla Parishad Job: कोल्हापूर जिल्हा परिषदेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सध्या डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे.कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभाग प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेद्वारे ही भरती करण्यात येणार आहे. डेटा एन्ट्री पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेत चांगली नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.याबाबत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Kolhapur Zilla Parishad Job)

या नोकरीसाठी १२ वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना इंग्रजी आणि मराठी टायपिंग यायला हवे. या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवारांना २५००० रुपये पगार देण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची सुरुवात १२ डिसेंबर २०२४ पासून झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा १० जानेवारी २०२५ रोजी होऊ शकतात. याबाबत अधिक अपडेट कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर देण्यात आले आहेत. (Government Job)

या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे तुम्ही अर्ज पाठवायचा आहे.या नोकरीसाठी अर्जासोबत १०वी आणि १२वी पास प्रमाणपत्रे जोडायची आहे. तसेच फोटो, MSCIT, टायपिंग प्रमाणपत्र सादर करायला हवेत.

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु सरकारी नोकरी म्हटल्यावर सर्वांना स्पर्धा परिक्षेत पास व्हायचे, असे वाटते. परंतु अनेकदा सरकारी कंपनीत नोकरीची संधी आहे. जिल्हा परिषद, ग्राम पंचायत, सरकारी बँकेतदेखील तुम्ही नोकरी करु शकतात. सरकारी नोकरीबाबत सर्व अपडेट तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

SCROLL FOR NEXT