ITBP Recruitment 2024 SAAM TV
naukri-job-news

ITBP Recruitment 2024 : 10वी/12वी पास उमेदवारांसाठी ITBP मध्ये मोठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Constable Jobs : इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 10वी आणि 12वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. सविस्तर माहिती वाचा.

Shreya Maskar

इंडो-तिबेट सीमा पोलीस दला अंतर्गत पशुवैद्यकीय कर्मचारी पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची लिंक आजपासून म्हणजे १२ ऑगस्ट २०२४ पासून उघडण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर आहे.

रिक्त जागा किती?

या भरती मोहिमेद्वारे, आईटीबीपी पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या १२८ पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.

  • हेड कॉन्स्टेबल (व्हेटर्नरी) - ९ पदे

  • कॉन्स्टेबल (ॲनिमल अटेंडंट) - ११५ पदे

  • कॉन्स्टेबल (केनलमैन) - ४ पदे

अर्ज करण्याची पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळ्या पदानुसार आहे. तसेच आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.

हेड कॉन्स्टेबल पद

  • मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी उत्तीर्ण झालेले आणि पशुवैद्यकीय प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

  • वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे.

कॉन्स्टेबल (ॲनिमल अटेंडंट आणि केनलमैन)

  • १०वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

  • १८ ते २५ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

फी किती ?

  • फी फक्त ऑनलाइन जमा केले जाईल.

  • जरनल, ओबीसी, ईडब्ल्यूएस लोकांना पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पदासाठी अर्ज करायचा असल्यास १०० रुपये शुल्क भरावे लागेल.

  • एससी, एसटी, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा?

इंडो-तिबेट सीमा पोलीस दला अंतर्गत या पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाइन करता येईल. यासाठी तुम्हाला ITBP च्या अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर जावे लागेल.

पगार काय?

  • हेड कॉन्स्टेबल - २४ हजार रुपये ते ८१ हजार रुपये प्रति महिना

  • ॲनिमल ट्रान्सपोर्ट - २१ हजार ते ६९ हजार रुपये प्रति महिना

  • कॉन्स्टेबल केनलमैन - २१ हजार ते ६९ हजार रुपये प्रति महिना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

Nandurbar Accident : धुळे- सुरत महामार्गावर दोन भीषण अपघात; कोंडाईबारी घाटात वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT