ITBP Constable Recruitment 2024 
naukri-job-news

ITBP कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करण्याची पात्रता काय? आजपासून सुरू झालीय नोंदणी

ITBP Constable Recruitment 2024: ITBP कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पात्रता काय हे तुम्हाला माहिती आहे का?

Bharat Jadhav

लष्करात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) साठी आजपासून म्हणजेच 2 सप्टेंबर 2024 पासून कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली.

यासाठी इच्छुक उमेदवारांना recruitment.itbpolice.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ITBP कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार वरील अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील.या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करावेत.

किती पदांची होणार भरती?

या भरती मोहिमेद्वारे एकूण 819 कॉन्स्टेबल (किचन सर्व्हिसेस) पदांची भरती केली जाईल.

पुरुषासाठी : ६९७ जागा

महिलांसाठी: १२२ जागा

शैक्षणिक पात्रता काय?

ITBP कॉन्स्टेबल भरती (स्वयंपाकघर सेवा) साठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून 10वी किंवा मॅट्रिक उत्तीर्ण असले पाहिजेत. तसेच त्यांनी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाद्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून अन्न उत्पादन किंवा स्वयंपाकघरातील NSQF स्तर 1 अभ्यासक्रमाचा अभ्यास केलेला असावा. संबंधित विषयांबद्दल अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

अर्ज कसा करायचा

खाली दिलेल्या स्टेप अनुसार उमेदवार ITBP कॉन्स्टेबल भरती (स्वयंपाकघर सेवा) साठी अर्ज करू शकतील.

सर्वात आधी ITBP recruitment.itbpolice.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेली ITBP कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2024 (किचन सर्व्हिस) अर्जाची लिंक उघडा.

त्यानंतर आधी तुमची नोंदणी करा. तुमची लॉगिन माहिती मिळवा.

आता अर्ज भरण्यासाठी पुढे जा म्हणजेच नेक्स्ट पेजवर जा.

त्यानंतर आवश्यक माहिती प्रविष्ट करा, कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.

शेवटी तुमचा फॉर्म सबमिट करा. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्याची पावती डाउनलोड करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

SCROLL FOR NEXT