IB Recruitment Saam Tv
naukri-job-news

IB Recruitment: १०वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! गुप्तचर विभागात नोकरीची संधी; पगार मिळणार ₹ ६९,१००

Intelligence Bureau Security Bharti: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. सध्या सिक्युरिटी सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारद्वारे गुप्तचर विभागात भरती जाहीर केली आहे. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये सुरक्षा सहाय्यक पदासाठी भरती जाहीर करण्यात आला आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी भरतीची जाहिरात इंटेलिजेंस ब्युरो (गृह मंत्रालयाद्वारे) जाहिर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुकांनी अधिसूचना वाचावी.

केंद्र सरकारअंतर्गत ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ४५५ पदे भरती करण्यात आली आहे. सुरक्षा सहाय्यक पदांसठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. यासाठी तुम्ही अधिसूचना वाचावी.

या नोकरीसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना २१,७०० ते ६९,१०० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. १८ ते २७ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. सरकारी विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी आहे.

सुरक्षा सहाय्यक (मोटर वाहतूक) पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत मोटर कारसाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. ही भरती संपूर्ण भारतात होणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांटी निवड परीक्षेद्वारे होणार आहे. यासाठी आधी तुम्हाला www.mha.gov.in किंवा www.ncs.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०२ देण्यात आली आहे.या नोकरीसाठी तुम्ही मूदतीपूर्वी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जनगणनेसाठी निघालेल्या शिक्षिकेसोबत भयंकर घडलं! मुख्याध्यापकाने केली हत्या; नंतर मृतदेह जाळला

Worli Sea Link : मुंबईत खळबळ! ठाण्याच्या उद्योजकाची आत्महत्या, वरळी सी-लिंकवरून टाकली उडी

Electric vehicle: पावसाळ्यात इलेक्ट्रिक गाडी चार्ज करणं सुरक्षित असतं का?

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत स्मार्ट मीटरवरून मनसे आक्रमक

PF Withdrawal Rules: नोकरी करताना संपूर्ण PF काढता येतो का? EPFO च्या नियमांमध्ये काय आहे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT