Electric vehicle: पावसाळ्यात इलेक्ट्रिक गाडी चार्ज करणं सुरक्षित असतं का?

Surabhi Jayashree Jagdish

इलेक्ट्रिक गाडी

पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहन चार्ज करणं सुरक्षित असतं आणि यासाठी घाबरण्याची गरज नसते. बहुतांश आधुनिक इलेक्ट्रिक वाहनं आणि त्यांचे चार्जर पाऊस व ओलाव्यापासून संरक्षण लक्षात घेऊन तयार केलेले असतात.

monsoon EV safety | saam tv

चार्जिंग करण्यापूर्वी पोर्ट आणि केबल तपासा

चार्जिंग सुरू करण्यापूर्वी चार्जिंग पोर्ट आणि केबलची नीट पाहणी करावी. पोर्टमध्ये धूळ, चिखल किंवा पाणी शिरलेले नाही ना, याची खात्री करणं आवश्यक आहे. सर्व काही कोरडे आणि व्यवस्थित असल्यावरच चार्जिंग सुरू करावेत.

electric car charging | saam tv

पोर्ट किंवा प्लग तपासा

चार्जिंग पोर्ट किंवा प्लगमध्ये पाणी साचलेले दिसल्यास लगेच चार्जिंग सुरू करू नये. प्रथम ते पूर्णपणे कोरडे होईपर्यंत थांबावं. ओल्या पोर्टमधून चार्जिंग केल्यास नुकसान होण्याचा धोका वाढू शकतो.

rainy season charging | saam tv

खराब केबलचा वापर टाळा

चार्जिंगसाठी वापरण्यात येणारी केबल कुठे तुटलेली किंवा खराब झालेली नाही ना, हे तपासणं गरजेचं आहे. खराब केबलमुळे चार्जिंगमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात आणि सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नेहमी चांगल्या स्थितीतील केबलच वापरावी.

EV charging tips | saam tv

नेहमी कंपनीने दिलेलाच चार्जर वापरा

इलेक्ट्रिक वाहनासाठी वाहन उत्पादक कंपनीने शिफारस केलेला चार्जरच वापरणं योग्य आहे. इतर किंवा दर्जाहीन चार्जर वापरल्यास चार्जिंगची कार्यक्षमता कमी होऊ शकते. तसंच वाहनाच्या बॅटरीवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

EV charging cable | saam tv

उघड्या जागेत चार्जिंग करताना विशेष काळजी घ्या

जर उघड्या जागेतील चार्जिंग स्टेशनवर वाहन चार्ज करत असाल तर त्या ठिकाणची सुरक्षितता तपासणं आवश्यक आहे. चार्जिंग स्टेशन व्यवस्थित स्थितीत आहे आणि त्याठिकाणी पाणी साचलेलं नाही याची खात्री करावी.

electric vehicle maintenance | saam tv

गाईडलाईन्सचं पालन करा

चार्जिंगदरम्यान कोणतीही समस्या जाणवल्यास वाहनाच्या User Manual सूचनांचं पालन करावं. गरज भासल्यास अधिकृत सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधावा. योग्य पद्धतीने आणि आवश्यक काळजी घेऊन चार्जिंग केल्यास पावसाळ्यातही इलेक्ट्रिक वाहन सुरक्षितपणे चार्ज करता येतं.

safe EV charging | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

heart attack prevention | saam tv
येथे क्लिक करा