IBPS Jobs : सरकारी नोकरीची संधी, तब्बल १० हजार जागांसाठी मेगाभरती! पगार वाचून थक्क व्हाल!

Government Bank Jobs : आयबीपीएस क्लर्क भरती २०२५ अंतर्गत १०,२७७ सरकारी बँक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पदवीधर उमेदवार www.ibps.in वर २१ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. संधीचा फायदा घ्या!
 Bank Jobs
Government Bank JobsSaam Tv
Published On
Summary
  • IBPS क्लर्क भरती 2025 साठी 10,277 पदांची मोठी जाहिरात जाहीर.

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025 असून, परीक्षा दोन टप्प्यांत होणार.

  • पात्रता: कोणत्याही विषयात पदवीधर आणि वयोमर्यादा 20-28 वर्षे.

  • निवड झालेल्या उमेदवारांना ₹24,050 ते ₹64,480 पगार व विविध भत्ते मिळणार.

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने क्लर्क पदासाठी १०,२७७ जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. ही भरती देशभरातील विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कस्टमर सर्व्हिस असोशिएट (Clerk) पदासाठी होणार असून, अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइट www.ibps.in वर सुरू झाली आहे.

आयबीपीएस क्लर्क भरती २०२५ ही परीक्षा दोन टप्प्यांत म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स अशाप्रकारे घेतली जाणार आहे. इच्छुक उमेदवार २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेचा पदवीधर असणे आवश्यक असून वयोमर्यादा २० ते २८ वर्षे अशी ठेवण्यात आली आहे. म्हणजेच, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९७ ते १ ऑगस्ट २००५ दरम्यान झालेला असावा.

 Bank Jobs
Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३३० पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

या भरती प्रक्रियेद्वारे सर्वाधिक पदे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्यांमध्ये आहेत. आयबीपीएस क्लर्क ही बँकिंग क्षेत्रातील एक प्रतिष्ठित नोकरी मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात आणि त्यात स्थान मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारीही करतात. निवड झालेल्या उमेदवारांना २४,०५० ते ६४,४८० रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार असून, त्यासोबत DA, HRA, TA यांसारखे इतर भत्तेही मिळतील. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळ न घालवता अर्ज करण्याची हीच योग्य वेळ आहे.

 Bank Jobs
Bank Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती सुरू; आजच करा अर्ज

अर्ज भरण्याची प्रक्रिया कशी आहे ?

  1. आयबीपीएस लिपिक भरती २०२५ फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट द्या.

  2. मूलभूत माहिती भरून नोंदणी करा.

  3. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.

  4. फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा आणि तेथे विचारलेले इतर तपशील भरा.

  5. फॉर्म पाहिल्यानंतर, अर्ज शुल्क भरा.

 Bank Jobs
Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदात सरकारी नोकरीची संधी; पगार ८५००० रुपये; अशा पद्धतीने करा अर्ज

आयबीपीएस क्लार्क भरती २०२५ ही केवळ नोकरीची संधी नसून बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि सन्माननीय करिअर घडवण्याचा एक मजबूत पर्याय आहे. विशेषतः पदवीधर तरुणांसाठी ही भरती एक मोठा टप्पा ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com